
वसंत ऋतूत आरोग्य जपायचंय! आयुर्वेदानुसार हा घ्या डाएट प्लॅन
ऋतु बदलला की त्याप्रमाणे हवेत बदल होतात. त्याप्रमाणे शरीरातही बदल होतात. म्हणून अशा काळात आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे असते. ऋतुमानानुसार आहार आणि आरोग्य कसे जपावे हे आयुर्वेदात सांगितले आहे. सध्या वसंत ऋतू सुरू आहे. या काळात हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, पचनशक्तीत समस्या निर्माण होतात. आयुर्वेदानुसार या काळात कफ दोष वाढू लागतो. तसेच या ऋतूत अग्नि तत्व कमी होऊ लागते आणि अपचन होण्याची समस्या वाढते. म्हणूनच वसंत ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदातील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
हेही वाचा: होमिऑपेथी औषध नुसते का चघळायचे? जाणून घ्या यामागचे शास्त्र

गोड पदार्थ जास्त खाऊ नये
अशी घ्या काळजी
- वसंत ऋतूत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी योग्य डाएट घेणे गरजेचे आहे.
- या दिवसात जास्त खाणे टाळले पाहिजे. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खाल्ले पाहिजे.
- आयुर्वेदानुसार वसंत ऋतूत गोड खाणे टाळावे.
- वसंत ऋुतत जास्त खारट किंवा तेलकट अन्नपदार्थ खाऊ नयेत. असे केल्याने तुमच्या शरीरातील कफ वाढू शकतो.
- या काळात उडदाची डाळ तसेच पुरी- कचोरी सारखे जड पदार्थ खाणे टाळावे.
- तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नका. असे केल्याने शरीरातील कफ वाढू शकतो.
हेही वाचा: चाळिशीनंतर अंडं खाणं योग्य का?

खिचडी
हे करा उपाय
-आयुर्वेदानुसार हवामान बदलावेळी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिल्यास कफ होण्यापासून रक्षण होईल.
- या ऋतूत कारलं, पडवळ अश्या कडू रस असलेल्या पदार्थांचा ज्यूस किंवा सूप पिणे चांगले.
- जड अन्न खाण्यापेक्षा पचायला हलके असलेले पदार्थ खा. तुम्ही मूगडाळ, खिचडी, दलिया असे पदार्थ खाऊ शकता.
- दूधी, कोबी, गाजर, पालक, मटार यासारख्या पौष्टीक भाज्यांचा आहारात समावेश करायला हवा.
या काळात मध आणि गरम पाणी एकत्र प्यायल्यास कफदोष कमी होईल तसेच तुम्हाला सर्दी- खोकला होणार नाही.
हेही वाचा: Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी