Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात
Water Weight
Water Weightesakal

Water Weight: पाणी पिणे शरीरासाठी नेहमी चांगले असते. पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहिती आहेतच. शरीराला (Body) हायड्रेट ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, निरोगी (Healthy) राहण्यासाठी भरपूर पाणी (Water) याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. पण, निरोगी राहण्याऐवजी शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी गेले तर नकळत अनेक समस्या निर्माण होऊ शकतातच. अशीच एक समस्या आहे ती म्हणजे वॉटर वेट. वॉटर वेट म्हणजे काय आणि अशी समस्या असल्यास कशी सोडवावी हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Water Weight
पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने वजन होते कमी!

वॉटर वेट म्हणजे काय? (What is Water Weight)- शरीरात जेव्हा पाण्याचे प्रमाण खूप जास्त होते तेव्हा तुमचे वजन खूप वाढते. अशी समस्या उद्भवल्यास त्याला वॉटर वेट म्हणतात. शरीरात पाणी साचल्याने किंवा जास्त पाणी निर्माण झाल्यामुळे शरीर सूजते, पोटावर चरबी साठणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

वॉटर वेटचे कारण- ही समस्या शारीरिक हालचाल कमी झाल्यास, जंक फूड अधिक खाल्ल्यास, गर्भावस्थेदरम्यान निर्माण होते. शरीराच्या वजनासोबत पाण्याचे वजन कमी जात्स होते. पण चांगली जीवनशैली अंगीकारून तुम्हाला शरीराचे वजन नियंत्रित ठेवता येते.

Water Weight
चाळिशीनंतर अंडं खाणं योग्य का?
salt
salt

ही समस्या कमी करण्याचे उपाय

साखर कमी खा- वॉटर वेट कमी करण्यासाठी तुम्ही साखर कमी प्रमाणात खा. साखर तुमच्या शरीरातल्या पाण्याचे प्रमाण वाढवून शरीर फुगवू शकते. त्यामुळे साखर कमी करून गुळाचा वापर करायला सुरूवात करा.

मीठ कमी खा- मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात पाणी अधिक प्रमाणात साठू शकते. त्यामुळे शरीराला सूज येते. त्यामुळे वजनही वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी आहारात तुम्हाला मीठ कमी करावे लागते. शरीराला प्रतिदिन २.३०० मिलीग्रॅम मीठ हवे असते.

Water Weight
ओट्स की कॉर्न फ्लेक्स! नाश्त्यासाठी योग्य पौष्टीक पर्याय कोणता?
Health effects of junk food
Health effects of junk food

डाएटमध्ये पोटॅशियम युक्त पदार्थांचा समावेश करा- वॉटर वेट कमी करण्यासाठी पोटॅशियमयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. पोटॅशियम शरीरातील स्नायूंना मजबूत करून मज्जासंस्था सुधारण्याचे काम करतात. तसेच शरीरातील वॉटर वेट कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

नियमित व्यायाम- वॉटर वेट कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्ही हलके फुलके व्यायाम आणि योग केल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडून शरीरातील सूज कमी करते.

जंक फूड खाणे बंद करा- वॉटर वेट कमी करण्यासाठी जंकफूड, तेलकट खाणे बंद करा. असे पदार्थ खाल्ल्याने तुमचे वॉटर वेट वाढू शकते.

Water Weight
स्तनाच्या कर्करोगाचे रक्त तपासणीमुळे होणार लवकर निदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com