जोपासना श्रद्धेची...

ravishankar
ravishankar

प्रश्‍न : श्रद्धा कशी वाढवावी?
गुरुदेव : तुमच्या मनात शंका कशा काय निर्माण होतात? तुमच्या शंका-कुशंकांवर लक्ष ठेवा; म्हणजे श्रद्धा आपोआप वाढायला लागेल. तुमच्या शंकांचा प्रकार आणि स्वभाव बघा. चांगले असते त्याचीच तुम्हाला शंका येते. अमुक एक व्यक्ती नालायक आहे, असे तुम्हाला कोणी येऊन सांगितल्यास त्या व्यक्तीच्या नालायकपणाविषयी तुम्ही शंका घेणार नाही. कारण नकारात्मक गोष्टींबद्दल तुम्हाला कधी शंका येणारच नाही. ‘‘मी तुझ्यावर भयंकर संतापलेलो आहे,’’ असे तुम्हाला कोणी येऊन सांगितल्यास त्याबद्दल तुमच्या मनात कसलीच शंका येणार नाही. पण, ‘‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,’’ असे कोणी सांगितल्यास तुम्ही लगेच विचारता ‘‘खरेच?’’, ‘‘तुला माझ्याकडून काय पाहिजे आहे?’’

तुमच्या क्षमतेबद्दल, तुमच्या सकारात्मक गोष्टींबद्दल तुम्हाला शंका असतात. तुम्ही तुमच्या क्षमतेबद्दल शंका घेता आणि आपल्या अक्षमतेबद्दल श्रद्धा बाळगता. लोकांच्या नकारात्मक गोष्टींबद्दल शंका घ्या. कोणी ताण-तणावाखाली काही बोलत असल्यास तुम्ही ते जसेच्या तसे स्वीकारता. ते लोक वाईटच आहेत, हे गृहीत धरून चालता. प्रत्येक वाईट माणसाच्या अंतर्मनात तुम्ही डोकावून पाहिल्यास तुम्हाला एक चांगला माणूस आढळेल. ताणतणावाखाली किंवा अज्ञानामुळे लोक वाईट वागतात. तुम्ही नकारात्मक गोष्टींबद्दल शंका घ्यायला लागाल तेव्हा सकारात्मक गोष्टींवर तुमचा विश्वास बसायला लागेल. जगातले सगळे लोकच निरुपयोगी आहेत, असे तुम्ही गृहीत धरून चालल्यास तुम्हाला कधी चांगली माणसे भेटणारच नाहीत. आपण नेहमी हा दृष्टिकोन समोर ठेवूनच आयुष्य जगत असतो. त्याउलट ‘‘सर्वच जण चांगले आहेत; परंतु काही कारणांमुळे ते असे वाईट वागत आहेत; ती कारणे आपण बघूया,’’ असा दृष्टिकोन आपण ठेवल्यास जग किती छान वाटेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शंका म्हणजे काय, हे समजल्यामुळे श्रद्धा वाढते. श्रद्धा वाढविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आपल्या प्राणाक्तीत वाढ करणे. प्राणाक्तीची पातळी खाली असल्यास आपल्या मनात शंका-कुशंका यायला लागतात. तुम्ही क्रिया करता, चांगला प्राणायाम करता तेव्हा तुमच्या मनात कुठल्या शंका निर्माण होत नाहीत. हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का? अशावेळी तुमचे मन स्वच्छ आणि सरळ असते. याचे मुख्य कारण म्हणजे प्राणायाम क्रिया केल्यामुळे तुमच्यातल्या ऊर्जेची पातळी वाढते. प्राणाक्तीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यास तुमच्या मनात शंका-कुशंका यायला लागतात. अगदी स्वत:बद्दलसुद्धा तुमच्या मनात शंका निर्माण व्हायला लागतात. स्वत:बरोबर अवतीभोवती असलेल्या माणसांबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण व्हायला लागतात; ईश्वरीतत्त्वाच्या अस्तित्वाबद्दल तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात; म्हणून तुमच्यातल्या प्राणाक्तीत वाढ करा, म्हणजे तुमच्या शंका-कुशंकांचे निरसन होईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा प्राणायाम, ध्यानधारणा करा. काही गोष्टी तुम्हाला त्यासाठी प्रत्यक्षात करायला लागतील. तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी तुम्हाला काहीतरी करायला लागेल. आपल्या अस्तित्वाच्या सात पातळ्या असतात. शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि सत्त्व, या त्या सात पातळ्या आहेत. स्वत्वाच्या मदतीनेच आपली सगळी कार्ये पार पडतात. म्हणूनच, आपण आपल्यातली प्राणशक्ती वाढविल्यास ऊर्जेच्या वरच्या पातळीमुळे आपण उच्च स्तरावर जाऊ शकतो; जीवनात बरेच काही साध्य करू शकतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com