चेतना तरंग : चुका टाळण्यासाठी...

चुका सर्वकाळ घडत असतात. चुकांमुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो आणि त्या सुधारण्याचा प्रयास करतो. पण मग अशा किती चुका तुम्ही सुधारू शकाल?
sri sri ravi shankar
sri sri ravi shankarSakal
Summary

चुका सर्वकाळ घडत असतात. चुकांमुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो आणि त्या सुधारण्याचा प्रयास करतो. पण मग अशा किती चुका तुम्ही सुधारू शकाल?

चुका सर्वकाळ घडत असतात. चुकांमुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो आणि त्या सुधारण्याचा प्रयास करतो. पण मग अशा किती चुका तुम्ही सुधारू शकाल? तुम्ही दुसऱ्यांच्या चुका दोन कारणांसाठी सुधारू पाहता. एक तर त्यांच्या चुका तुम्हाला त्रास देत राहतात म्हणून किंवा दुसरे कारण म्हणजे त्यांच्या चुका दर्शवून त्या सुधारण्यात त्यांना मदत करून तुम्ही त्यांच्या विकासात हातभार लावू इच्छिता. अशा वेळी त्या चुका तुम्हाला स्वतःला त्रास देत नसतात. तुम्हाला त्रास होतो या एकाच कारणामुळे चुका सुधारू पाहाल, तर ते सहसा जमत नाही.

दुसऱ्यांच्या चुका सुधारण्यासाठी तुमच्यापाशी अधिकार आणि प्रेम दोन्हीही हवेत. आता हे दोन गुण परस्परविरोधी वाटत असतील, पण वास्तवात ते तसे नाहीत. प्रेमाशिवाय अधिकार हा गुदमरून टाकणारा असतो आणि त्यामुळे उपयुक्त ठरत नाही. अधिकाररहित प्रेम उथळ आणि अप्रभावी ठरते. त्यामुळे उपयुक्त ठरण्यासाठी दोन्ही हवेत आणि तेही योग्य प्रमाणात हवेत. तसे असतील तरच तुम्ही दुसऱ्याच्या चुका सुधारण्यात यशस्वी ठराल. या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणत असण्यासाठी तुम्ही समतोल, एककेंद्रित आणि अनाग्रही असायला हवे.

तुम्ही दुसऱ्यांना चुका करण्याची संधी आणि स्वातंत्र्य देता, तेव्हा तुम्ही अधिकारात असता आणि त्यांच्यासाठी मान्यताप्राप्त बनता. त्यांना तुम्ही गोड वाटता. ईश्वरातदेखील असा दोन्ही गुणांचे समतोल असतो. कृष्ण आणि येशू असेच तर होते. जे लोक प्रेम करतात ते अधिकारही वापरतात. सर्व नाते-संबंधांमध्ये अधिकार आणि प्रेम एकत्र नांदत असतात.

अभय : पती नेहमी केवळ प्रेम करत असतो आणि सर्व अधिकार पत्नीकडे असतो.

माहकी : हे चुकीचं आहे का?

श्री श्री : मला ते सुधारायचं नाही! (हशा)

कोण कुणाला खूष करत आहे?

ईश्वराने मनुष्य आणि इतर सर्व जग निर्माण करताना त्यात प्रचंड वैविध्य आणले. त्याने अनेक प्रकारच्या सुंदर गोष्टी बनवल्या. किती तरी प्रकारच्या भाज्या, फुले, सुगंध, काटे, चित्र-विचित्र पशू आणि भयंकर भयावह दृश्येही ईश्वराने निर्माण केली. ही सर्व विविधता निर्माण करण्यामागे मनुष्याचे मनोरंजन करणे आणि त्याला खूष करणे हाच ईश्वराचा उद्देश होता. पण तरीही मनुष्य मात्र अधिकाधिक उदासrनतेच्या आणि नैराश्याच्या गर्तेत बुडत गेला.

हे पाहिल्यावर मात्र ईश्वर कठोर झाला. मग मनुष्यानेच ईश्वराला खूष करण्याचा प्रयास सुरू केला. अशा प्रकारे ईश्वराला खूष करण्यामध्ये मनुष्यप्राणी इतका व्यग्र झाला, की त्याला चिंता करण्यास आणि उदास व निराश होण्यास वेळच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे तो अधिक काळ आनंदात राहू लागला. आपण ज्याला खूष करावे असे आपले कुणी असते, तेव्हा आपण कार्यात व्यग्र राहतो आणि म्हणून आनंदी असतो. पण आपला उद्देश केवळ स्वतःसाठी सौख्य प्राप्त करणे असेल, तर मात्र नैराश्यात बुडायला वेळ लागत नाही.

खरे तर सुख आपल्यात हव्यास वाढवत असते. आपण मात्र सुखातून समाधान मिळवू पाहतो. खरे समाधान, खरी तृप्तीची भावना केवळ सेवेमधून प्राप्त होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com