चेतना तरंग : युद्ध : एक निकृष्ट कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravi Shankar

तर्काच्या बळावर आणि हेतूपुरस्सर केलेले सर्वात वाईट कृत्य म्हणजे युद्ध होय. प्रत्येक युद्धामागे काहीतरी कारण, काही हेतू असतात आणि ही कारणे त्या युद्धाचे समर्थन करण्यासाठी वापरली जातात.

चेतना तरंग : युद्ध : एक निकृष्ट कृत्य

तर्काच्या बळावर आणि हेतूपुरस्सर केलेले सर्वात वाईट कृत्य म्हणजे युद्ध होय. प्रत्येक युद्धामागे काहीतरी कारण, काही हेतू असतात आणि ही कारणे त्या युद्धाचे समर्थन करण्यासाठी वापरली जातात. युद्धात गुंतलेले किंवा युद्ध छेडणारे लोक तर्कशुद्ध कारणे देऊन असे समर्थन करतात. पण अशा कारणांना मर्यादा असतात. जेव्हा या कारणांमागचा तर्क बदलतो, तेव्हा असे समर्थन निष्फळ आणि बिनबुडाचे ठरते. युद्धाचे समर्थन करू पाहणारी कारणे ही काही मर्यादित मनांना आणि काही मर्यादित काळापुरतीच पटतात, योग्य वाटत राहतात. पण त्यामुळे या पृथ्वीवर युद्धे मात्र अटळ होतात.

कृत्याचे समर्थन

युद्ध हे मानवापुरतेच मर्यादित आहे. या सृष्टीतील इतर कोणतीही प्राणीजात जमावाचा संहार करणाऱ्या युद्धात सहभागी होत नाही आणि असे युद्ध छेडतही नाही. कारण त्यांच्याकडे तर्क अथवा हेतूच नसतात. प्राणी भूक लागल्यावर शिकार करतात आणि त्यावरच समाधानी राहतात. पण पुरातन काळापासून मानव तर्क, हेतू, कारणे यांना जोपासत आहे आणि त्यामुळे तो नेहमी युद्ध छेडत राहतो. आपल्या प्रत्येक कृत्यासाठी माणूस काही ना काही कारण सांगून त्या कृत्याचे समर्थन करू पाहतो. पण जेव्हा ही कारणे आणि तर्क काळानुसार बदलतात, तसे त्याचे समर्थन पोकळ, बिनबुडाचे ठरते.

ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, दैवी अनुभव लाभावा अशी इच्छा असेल, तर मानवाला आपल्या तर्कशक्तीच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. तर्क, हेतू, कारणे मानवाने समर्पित केली, की मग तो युद्ध करणार नाही. जेव्हा मानवाला ही जाणीव येईल, जेव्हा माणूस समंजस होऊन क्रोध, द्वेष आदी भावनांना त्यागेल आणि उच्च चैतन्याचा स्वीकार करेल, तेव्हाच युद्धे संपुष्टात येतील.

Web Title: Sri Sri Ravi Shankar Writes War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Warsri sri ravi shankar
go to top