esakal | चेतना तरंग : जवळीक कशी जपावी?
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

चेतना तरंग : जवळीक कशी जपावी?

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

जवळीक अथवा घनिष्ठ संबंध कशामुळे तुटतात?

 • तुमचा अहंकार अथवा धारणा

 • तीव्र इच्छा

 • जवळीक गृहीत धरणे

 • स्वतःमध्ये किंवा दुसऱ्यात त्रुटी शोधणे

 • अतीव अपेक्षा

 • संवेदनशीलता कमी असणे किंवा अतितीव्र असणे.

 • वैराग्य किंवा विवेकाचा अभाव

 • मत बनविण्याची सवय

 • कृतज्ञेचा अभाव आणि सतत कुरबुर

वर्तमानात राहा

जवळीक करणे म्हणजे अनंताशी एकरूप होऊन वर्तमान क्षणात राहणे. घटना आणि प्रसंगांमुळे प्रभावित न होता त्यांना जगून त्यांच्या पलीकडे जाणे. घटनांच्या पलीकडे पहा, अनंतात विलीन व्हा, वर्तमानात राहा.

याप्रकारे जवळीक जपता येईल

 • तुम्ही सत्संगामध्ये बसाल, तर तुम्हाला फारसे काही मिळत नाही. पण तुम्ही सत्संगामध्ये बसत नसाल, तर तुम्ही खूप काही घालवत आहात!

 • तुम्ही जसे आहात आणि जे काही आहात, तसेच अस्तित्व जपण्यासाठी तरी तुम्हाला सत्संगात बसायला हवे.

 • आता एक स्वाध्याय सुरू करा. रोज एकट्याचाच सत्संग साजरा करा. भजने गा आणि कुशलतेने ज्ञानासंबंधी दहा मिनिटांची, तरी चर्चा कुणा एकाबरोबर करा. तुम्हाला तर शिळोप्याची चर्चा करण्याची, गप्पा मारण्याची एवढी सवय पडून गेली आहे. आता, दोन आठवड्यांपर्यंत तुमच्याकडचे ज्ञान इतरांबरोबर वाटा. अध्यात्माचे ज्ञान! विशेषतः जे लोक साप्ताहिक सत्संगात येत नाहीत, त्यांच्यासोबत ज्ञानविषयक चर्चा करा.

‘सर्व काही क्षणभंगुर आहे. सर्व काही सर्वकाळ बदलत आहे,’ या ज्ञानाची चर्चा करा. या जगातील सर्व कसे अशाश्वत असून सर्व काळ बदलत आहे, याबद्दल चर्चा करा.

loading image