चेतना तरंग : मनाची पूर्णावस्था

चेतना तरंग : मनाची पूर्णावस्था

आपला आवाज दमदार असायला पाहिजे. ज्यावेळेस सत्याचा आणि धर्माचा आवाज क्षीण झाल्यास हिंसाचाराचा आवाज वाढतो आणि सगळीकडे प्रश्न निर्माण होऊ लागतात. प्रेमाचा आवाज हक्क गाजवायला लागल्यावर हिंसाचाराचा आवाज क्षीण होतो. यालाच सत्युग म्हणतात. श्रीरामाचा आवाज रावणापेक्षा मोठा असायला पाहिजे, म्हणूनच श्रीरामाने रावणावर विजय मिळविला. हेच श्रीकृष्णाच्या बाबतीत घडले.

जीवनात ज्यावेळी संघर्ष निर्माण होऊ लागतात, तेव्हा आपले लक्ष ज्ञानार्जनावर केंद्रित करायला हवे. अगदी अर्जुनाला सुद्धा हाच सल्ला दिलेला होता. आधी ज्ञान संपादन कर, ध्यानधारणा कर आणि मगच लढाई कर, असे त्याला सांगितले होते. नेहमी ज्ञानात राहावे आणि मग काम करावे. ज्ञान संपादन करण्यासाठी आपल्याला हिमालयात जायची आवश्यकता नाही. दैनंदिन जीवनातल्या रोजच्या व्यवहारातून सुद्धा ज्ञानार्जन होऊ शकते. कामात परिपूर्णतेचा आग्रह धरल्यामुळे कधी कधी संताप येतो. चिडचिड होते. एखाद्याने चुकीचे काम केले तर त्यामुळे राग येतो.

पूर्णावस्थेचे तीन प्रकार आहेत
१) मनाच्या पूर्णतेमुळे मन शांत राहते.
२) वाचेची पूर्णावस्था, म्हणजे गरज असेल तरच बोला, उगाच भांडू नका.
३) क्रियेतील पूर्णावस्था. कृतीत १०० टक्के पूर्णतः साध्य होणे

साधना, सेवा आणि सत्संग या तीन गोष्टींमुळे मन आणि वाचा यांची परिपूर्णता आपण मिळवू शकतो. आणि एकदा मन आणि वाचा परिपूर्ण झाले की मग आपोआप आपले कामही पूर्णपणे निर्दोष होऊ लागते. सगळ्यांना सामावून घ्यायची भारताची संस्कृती आहे. कोणीही परका नाही, सगळे आपलेच आहेत. उदाहरणार्थ ‘गुरू ग्रंथ साहेबा’मध्ये  ब्रह्मज्ञान हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारताचे हेच खास वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान आपल्या पुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार सगळीकडे झाला पाहिजे, त्या ज्ञानाचा फायदा सगळ्यांना मिळाला पाहिजे. ‘‘आपण इतक्या देव-देवतांना कशासाठी पुजतो,’’ असा प्रश्न बऱ्याचवेळा लोक विचारतात. परमात्मा एक असला, तरी त्याला अनेक रूपात स्मरतात. ज्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून आपण न्युडल्स बनवितो, सामोसे बनवितो किंवा इतर काही पदार्थ बनवतो पण शेवटी ते एकच पीठ असते. त्याचप्रमाणे परमात्मा एकच असला, तरी त्याला वेगवेगळ्या नावांनी, निरनिराळ्या रूपात रंगात आपण स्मरत असतो.

आरती याचा अर्थ पूर्णानंद. ज्यावेळेस आपले जीवन ईश्वरामध्येच गुंतलेले असते, तेव्हा आपण आनंदात असतो. धार्मिक विधीतील रूढी आणि संस्कार आपण समजून घेतले पाहिजेत; त्याचा योग्य अन्वयार्थ लावला पाहिजे. म्हणजे मग आपणही आनंदी होवू आणि इतरांनाही आनंदी करू. दु:खापासून आपल्याला सुटका मिळाली पाहिजे. आपण नियमित प्राणायाम केला पाहिजे. निदान रोज १० मिनिटे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. असे करण्यालाच ‘प्राणायाम’ किंवा ‘क्रिया’ म्हणतात. यांच्या मदतीने आपण आनंदाची प्रचिती घेऊ शकतो; त्या आत्मानंदात पूर्ण विश्रांती मिळवू शकतो. क्रियेमुळे मन, बुद्धी आणि भावना शुद्ध होतात, आरोग्य चांगले राहते. क्रियेमुळे आपल्या मनात रेंगाळत असलेली अपराधीपणाची भावना नष्ट होते, आपण वर्तमान क्षणात राहायला लागतो. तुम्ही सेल फोन वापरता का? त्यात सिम कार्ड नसेल, तर नुसती बटणे दाबून तो चालेल का? समजा सिम कार्ड असेल, पण ‘रेंज’ नसेल तर तो काम करेल का? समजा सिम कार्ड असले रेंजही असली पण फोन चार्ज झालेला नसेल तर तो चालेल का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com