चेतना तरंग : एकात्म हेच अंतिम सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri sri ravi shankar

बुद्धी ही विभाजन आणि एकत्रीकरण करीत असते. या जगातील काही जीव हे केवळ विभाजन करतात आणि काही केवळ एकत्रीकरण.

चेतना तरंग : एकात्म हेच अंतिम सत्य

बुद्धी ही विभाजन आणि एकत्रीकरण करीत असते. या जगातील काही जीव हे केवळ विभाजन करतात आणि काही केवळ एकत्रीकरण. केवळ मानव मात्र विभाजन आणि एकत्रीकरण, दोन्ही करतो. मुंग्या एकत्रीकरणच करतात. त्या मोठी वारुळे बनवतात आणि अन्न वगैरे गोळा करतात. बीवर हा प्राणी बांध घालण्यासाठी लाकूड आणि काड्या गोळा करतो. अनेक पक्षी गवत-काड्या गोळा करून घरटी बांधतात. माकडे एकत्रीकरण करू शकत नाहीत. ती केवळ विभाजन करतात. त्यांना एक फुलाचा हार दिलात तर त्या हाराचे अनेक तुकडे करून, प्रत्येक फुलाच्या पाकळ्या अलग करून ती सगळीकडे पसरवतील. माकडे केवळ विभाजन करून त्याचे पृथक्करण करतात.

मनुष्य मात्र पृथक्करणासाठी विभाजन करतो आणि एकत्रीकरणही. संपूर्ण जगाचे विभाजन करून पृथःकरण झाल्यावर बुद्धीला सत्याचे दर्शन होते आणि मग सत्य सगळ्या गोष्टींचे एका गोष्टीत एकत्रीकरण करते. जेव्हा बुद्धिमत्ता शांत होते, तेव्हा बुद्धी विकसित व प्रकट होते. लोकांना सहसा वाटते. की माहिती एकत्र केल्याने कुणी बुद्धिमान होतो. असे नाही. बुद्धिमत्ता ही समाधीमुळे प्रगट होते. बुद्धिहीन माणसाकडे कितीही माहिती असली, तरी तो सृजनशील होऊ शकत नाही. बुद्धिमान माणूस फारशी माहिती हाताशी नसली तरी सृजनशील बनू शकतो. अनेकात एक पाहू शकणारा आणि एकात अनेक शोधू शकणारा मनुष्यच बुद्धिमान असतो.

एक प्राचीन सुभाषित आहे

काहीही नवे सुरू न करणे हे बुद्धिमत्तेचे पहिले लक्षण आहे. आणि जर काही नवे सुरु केले तर ते पूर्णत्वापर्यंत नेणे हे बुद्धिमत्तेचे दुसरे लक्षण.

म्हणून सांगतो, कुणाला जर तुम्ही नाराज केले असेल, तर तेवढ्यावरच थांबू नका, त्याला टोकापर्यंत घेऊन जा! (हशा)

सगळ्यांपासून ‘गुप्त’ ठेवलेली श्रीश्रींची समुद्रकाठावरची सहल त्यांच्यामागून पाठलाग करणाऱ्या पन्नास भक्तांनी अनुभवली! श्रीश्रींच्या गाडीचा चालक गुरुजींच्या सान्निध्यात आनंदाने इतका बेभान झाला की त्याने स्वतःच्या गाडीबरोबरच ही सर्व आनंदयात्रा समुद्रकिनाऱ्याच्या मार्गावरून मुख्य रस्त्यावर भरकटून आणली. बघ्यांना याची खूप गंमत वाटली.

Web Title: Sri Sri Ravishankar Writes Ekatma Is The Ultimate Truth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sri sri ravi shankar
go to top