esakal | तंदुरुस्त आणि फीट आरोग्यासाठी सायकल उत्तमच...
sakal

बोलून बातमी शोधा

A story about how cycling is important for health on the occasion of World Cycling Day

३ मे 'जागतिक सायकल दिवस'. प्रत्येकांनी लहानपणी सायकल नक्कीच चालवली असेल. सायकल चालवताना आपण अनेकदा सायकलवरून पडलो असेलच, त्याशिवाय आपण सायकल चालवण्यास शिकतच नाही.  इतर खेळाडूसारखा हाय एक खेळ प्रकार आहे. पण आता काही प्रमाणात सायकल चालवण्याची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य स्वास्थ्य ठेवणं सर्वांसमोर आव्हानच आहे. आपल्यापैकी अनेक जण आरोग्यदायी जीवनासाठी धडपडतच असतात. आपल्या आरोग्यासाठी सायकल चालवणे किती फायदेशीर आहे, याचा विचार करून सायकलचा वापर केला पाहिजे.

तंदुरुस्त आणि फीट आरोग्यासाठी सायकल उत्तमच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

३ मे 'जागतिक सायकल दिवस'. प्रत्येकांनी लहानपणी सायकल नक्कीच चालवली असेल. सायकल चालवताना आपण अनेकदा सायकलवरून पडलो असेलच, त्याशिवाय आपण सायकल चालवण्यास शिकतच नाही.  इतर खेळाडूसारखा हाय एक खेळ प्रकार आहे. पण आता काही प्रमाणात सायकल चालवण्याची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य स्वास्थ्य ठेवणं सर्वांसमोर आव्हानच आहे. आपल्यापैकी अनेक जण आरोग्यदायी जीवनासाठी धडपडतच असतात. आपल्या आरोग्यासाठी सायकल चालवणे किती फायदेशीर आहे, याचा विचार करून सायकलचा वापर केला पाहिजे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठी दुचाकी आणि चारचाकी यांचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. या कारणांमुळे प्रदूषणाचा धोका वाढला जातो. यावर एक उपाय म्हणजे प्रवासासाठी सायकलचा वापर करणे हे आरोग्यास उत्तम ठरू शकते. प्रदूषण रोखणेसोबत शारीरिक आरोग्यासाठी सायकल चालवणे उत्तम व्यायाम ठरतो, त्यामुळे सर्वांनीच सायकल चालवण्याचा निर्णय केला पाहिजे. सायकलिंगमुळे शरीराच्या मांसपेशी, सांधे आणि हाडांची हालचाल होते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही मदत मिळते. सायकल चालवण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण सायकलिंगमध्ये आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंचा व्यायाम होतो. रोज अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून ५०० ते ८०० कॅलरीज बर्न करता येतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास सायकल चालवण्याने मदत होते. सायकलिंगमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. 
हेही वाचा : तुम्ही पाहू शकता Live निसर्ग चक्रीवादळ कुठे आहे ते
सायकलिंगमुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरीत्या काम करतो. मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा येणे हे सर्व सायकलिंगने कमी होते. सायकल चालवल्यामुळे शरीराची एक्सरसाईज होते, त्यामुळे झोप निवांत लागून सकाळी ताजेतवाने वाटते. शरीराच्या फिटनेससाठी सायकलिंगच्या व्यायामाचा फायदा होतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी सायकल चालवणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.

सायकलचा व्यायाम

 • - सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार आहे. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण व्यवस्थित होते. - शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
 • - रोजच्या व्यायामासाठी नियमित सायकल चालवावी. जर काही कारणाने सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास घरच्याघरी किंवा जिममध्ये व्यायामाची सायकल वापरूनही वर्कआऊट करता येतो. 

फायदे

 • - नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.‌
 • -  सायकलिंगमुळे उत्तम व्यायाम होतो तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. 
 • - हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने निरोगी राहण्यास मदत होते.
 • - सायकल चालवणे सोपे असते, सायकलिंगमुळे पार्किंग समस्या होत नाहीत, वाहतुकीची कोंडी  होत नाही, जीवघेणे अपघातही होत नाहीत.
 • -  सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो.
 • -  सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते.
 • - सायकलिंगसाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते, त्यामुळे पैसाही वाचण्यास मदत होते.
 • - सायकल चालवण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होतो.
 • - सायकलिंग केल्यास वजन नियंत्रित राहते.
 • - इतर वाहनांच्या तुलनेत सायकल चालवण्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाणही कमी होते.