तुम्ही पाहू शकतात LIVE निसर्ग चक्रीवादळ कुठे आहे ते

Link viral on social media to watch nature storm live
Link viral on social media to watch nature storm live

सोलापूर : राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असताना आता ‘निसर्ग‘ चक्रीवादळाचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ते 'सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म'चे रूप धारण करू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक लिंक व्हायरल होत असून या द्‌वारे ‘तुम्हीही पाहू शकता निसर्व चक्रीवादळ कुठे आहे ते’ असं म्हणून एक लिंक शेअर केली आहे.
राज्यात निसर्ग चक्रीवादळ कोठे येणार, कसे येणार, काय दक्षता घ्यायची याचीच चर्चा घराघरामध्ये रंगली आहे. त्यातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक लिंक व्हायरल होत असून त्यात म्हटलं की ‘तुम्ही आता LIVE बघू शकता की, वादळ कुठे आहे. व त्याचा पुढचा प्रवास कसा आहे.’ यासाठी windy.com ही लिंक देण्यात आली असून यावर क्लिक करण्याचे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा : अलिबागमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला
चक्रीवादळाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी म्हणाले, मान्सूनच्या प्रगतीसाठी वादळे मोठी भूमिका बजावत असतात. समुद्रामध्ये वादळे नेहमीच होत असतात. ती किनाऱ्यांवर येऊन जेव्हा धडकतात, तेव्हा त्यांच्या तीव्रतेची जाणीव आपल्याला होते. बऱ्याचदा निर्मनुष्य बेटांवर वादळे धडकत असतात. तिथे कोणाचेच नुकसान नसल्याने त्याची चर्चा होत नाही. समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचा पावसावर परिणाम होतो. त्यातून कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे पाऊस पडतो. वादळाबद्दल भारतीय हवामान खात्याच्या वतीने केले जाणारे अंदाज ९५ टक्के अचूक ठरत आहेत. त्यासाठी योग्य तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उपग्रहांच्या माध्यमातून मिळणारी माहिती अनेकदा अचूक ठरत आहे. त्यामुळेच मागे ओरिसा आणि पूर्वेकडील किनाऱ्यांवर आदळलेल्या वादळामुळे कमीत कमी जीवित व वित्त हानी झाली. वादळांबद्दलच्या अचूक अंदाजांचा आपल्याला फायदाच झाला आहे. निसर्ग वादळाची सूचना आधीच मिळाल्याने किनाऱ्यावरील जनतेला सुरक्षित ठिकाणी जाता आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्टिवट करुन ‘निसर्ग’ चक्रीवादळ दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, असे सांगून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनार पट्टीवरील नागरिकांनी घरातच सुरक्षित ठिकाणी थांबावे वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागरिकांशी फेसबुकच्या मध्यमातून संवाध सादला तेव्हा ते् म्हणाले, घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा. महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा. बॅटरीवर चालणाऱ्या आणि राखीव पॉवरच्या यंत्रांची नियमित परीक्षण करा. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा. आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा. मोठं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा. विद्युत उपकरणं तपासा. पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या सूचना
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना : वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, शेतातील इतर कामे (फवारणी, खत देणे) शक्यतो टाळावीत. वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी भाजीपाला व फळपिकांना आधार द्यावा. जनावरांना झाडाखाली किंवा कोणत्याही मोठ्या झाडाजवळ बांधू नका, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा. शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्‍यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com