esakal | टिक बाइट म्हणजे काय? जाणून घ्या, कारण, लक्षणं अन् उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

tick bite

टिक बाइट म्हणजे काय? जाणून घ्या, कारण, लक्षणं अन् उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : टिक बाइट म्हणजे काय? (what is tick bite) टिक हा एक किडा आहे ज्याच्या चाव्याव्दारे होणाऱ्या संसर्गास टिक बाइट म्हणतात. त्वचेवर चावा घेऊन ते रक्त काढतात. हा किडा बहुतेक डोंगराळ भागात आढळत असून तपकिरी, काळा किंवा लाल रंगाचा असू शकतो. टिक चावल्यावर त्वचेचा रंग लाल होतो किंवा पुरळ येऊन (symptoms of tick bite) त्याठिकाणची त्वचा जळते. टिक चावल्यानंतरही गंभीर लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. (symptoms and causes treatment of tick bite in marathi)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

टिक चावण्याची लक्षणे कोणती?

टिक चावल्यानंतर त्वचा लाल होते. सर्व टिक्स हानिकारक नसतात. मात्र, आपल्याला त्याला हलक्यात घेऊ नये. संक्रमण पसरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. असे काही कीटक असतात जे मानवांमधून प्राण्यांमध्ये किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संसर्ग पसरवतात. टिक चावल्यानंतर तीव्र संसर्ग असेल तर श्वास घेण्यास त्रास होणे, डोक्यात वेदना आदी लक्षणं जाणवतात.

टिक बाइटचे निदान कसे करावे?

  • टिक न चावताच तुमच्या त्वचेला खाज सुटत असेल तर आपले डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देउ शकतील.

  • किडा चावल्यानंतर त्याचा काटा जर त्वचेतून काढला नसेल तर डॉक्टर त्यास चिमटा किंवा इतर साधनांमधून काढेल.

  • आपण घरीच त्वचेतून कीटक देखील काढून टाकू शकता. परंतु, जर कीटकांचा काही भाग आपल्या शरीरात राहिला तर संसर्ग होण्याचा धोका असतो.

टिक बाइट टाळण्यासाठी काय करावे?

  • टिक बाईट टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तेथे गवत किंवा झुडपे असलेल्या ठिकाणी न जाणे.

  • तुम्ही डोंगराळ किंवा गवताळ प्रदेशात गेलात तरी कीटकांच्या जवळ जाणे टाळा.

  • गवत किंवा डोंगराळ भागात जाताना आपल्या शरीराचा अधिक भाग लपविण्यासाठी संपूर्ण स्लीव्हचा शर्ट आणि संपूर्ण पँट घाला.

  • बाहेर जाताना पांढरे कपडे घाला. कारण लवकरच तुमच्या आसपास कीटक येणार नाहीत.

  • संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी बाहेरून येण्याच्या दोन तासांच्या आत शॉवर घ्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)