Yellow Fungus: काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर आणखी एक आजार

जाणून घ्या, Yellow Fungusची लक्षणे, कारणे आणि उपाय
Yellow Fungus: काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर आणखी एक आजार
esakal

कोरोना (Corona) आणि म्युकोरमायकोसिस या दोन गंभीर आजारांचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच काही दिवसांपूर्वी White Fungus या नव्या आजाराने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे त्यासोबतच आता आणखी एक नवं संकट समोर येऊन उभं ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगस(Black Fungus) , व्हाईट फंगसनंतर (White Fungus) आता देशात यल्लो फंगस (Yellow Fungus) या नव्या आजाराने शिरकाव केल्याचं सांगण्यात येत आहे. गाजियाबादमध्ये या नव्या विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. (symptoms causes of yellow fungus which is more dangerous than black fungus and white fungus)

गाजियाबाद येथे राहणाऱ्या या ३४ वर्षीय व्यक्तीमध्ये यल्लो फंगसचे काही विषाणू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोबतच त्याला मधुमेहदेखील असल्याचं सांगण्यात येत आहे.

Yellow Fungus: काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर आणखी एक आजार
फळं खरेदी केल्यावर तुम्ही नाही ना करत 'ही' चूक

यल्लो फंगस हा ब्लॅक व व्हाइट या दोन्ही विषाणूंपेक्षा जास्त घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. या विषाणूमुळे रुग्णाला प्रमाणापेक्षा जास्त अशक्तपणा जाणवतो.

यल्लो फंगसची लक्षणे -

१. अशक्तपणा येणे.

२. सुस्ती येणे.

३. भूक न लागणे

४. वजन कमी होणे.

५. एखाद्या व्यक्तीस जखम असल्यास जखम भरुन निघण्यास वेळ लागणे

६. डोळे खोल जाणे.

७. शारीरिक हालचाली मंदावणे.

यल्लो फंगसचा प्रादुर्भाव वाढण्याचं कारण

यल्लो फंगस अस्वच्छपणा व दुषित पाणी यामुळे पसरतो. त्यामुळे आपल्या आजुबाजुचा परिसर व घर स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या दिवांमध्ये उकळून गाळून पाणी प्यावं. तसंच शिळं अन्न खाऊ नये.

उपाय -

यल्लो फंगसची कोणतीही लक्षण जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. या आजारावर amphoteracin b हे इंजक्शन गुणकारी असल्यासं म्हटलं जातं आहे. हे इंजक्शन ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीफंगल आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या इंजक्शनचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com