esakal | नाकातून रक्त येणे असू शकतं उच्च रक्तदाबाचं लक्षण, वाचा संकेत अन् उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

symptoms of high blood pressure nagpur health news

अनेकांना आपल्याला हा आजार आहे याबाबत माहिती नसते. त्यासाठी तुमचा रक्तदाब व्यवस्थित आहे किंवा नाही हे नियमित तपासा. अनेकवेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात. आज उच्च रक्तदाबाचे काही संकेत आणि त्यावरील काही उपायांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

नाकातून रक्त येणे असू शकतं उच्च रक्तदाबाचं लक्षण, वाचा संकेत अन् उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : उच्च रक्तादाबासंबधी महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला याचा त्रास आहे, हेच माहिती नसते. कारण याचे कुठलेही लक्षणे दिसत नाहीत. अधिक गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर या आजाराचे लक्षण दिसतात. अनेकांना आपल्याला हा आजार आहे याबाबत माहिती नसते. त्यासाठी तुमचा रक्तदाब व्यवस्थित आहे किंवा नाही हे नियमित तपासा. अनेकवेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात. आज उच्च रक्तदाबाचे काही संकेत आणि त्यावरील काही उपायांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हेही वाचा - अमरावतीकरांनो! यंदाही जाणवणार पाणीटंचाईच्या झळा, धरणात कमी पाणीसाठा

उच्च रक्तदाबाचे लक्षणे -

 • डोकेदुखी
 • नाकातून रक्त येणे
 • थकावट
 • डोळ्याच्या दृष्टीमध्ये बदल
 • छातीत दुखणे
 • श्वास घेण्यास त्रास
 • हृदयाचे अनियमित ठोके
 • लघवीमध्ये रक्त
 • हिरड्यांना सूजन

अनेकांना वाटतं, की उच्च रक्तदाबासंबंधी अन्य काही लक्षण असू शकतात. मात्र, ते उच्च रक्तदाबाचे लक्षणे नसतात. 

 • चक्कर येणे
 • घाबरल्यासारखे वाटणे
 • घाम येणे
 • झोप न येणे
 • चेहरा निस्तेज दिसणे

हेही वाचा - इंजेक्शन देताच चिमुकलीचा मृत्यू; इंटर्नच्या भरवशावर...

उच्च रक्तदाबावर घरगुती उपाय -

हेल्टी डायट -
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहार चांगला असणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हृदयायचे आजार, स्ट्रोक आणि हृदय विकाराचा झटका इत्यादी आजारा होऊ शकतात. त्यामुळे फळे, भाज्या, मांसे आदी पदार्थ्यांचे सेवन करा.

व्यायाम -
एक हेल्दी वजनापर्यंत पोहोचण्यासाठी शारीरिक हालचाली करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने तणाव देखील दूर होतो. तसेच अनेक आजारांपासून सुटका होते.

हेल्दी वजन ठेवा -
तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असेल तर हेल्दी आहार घेऊन वजन कमी करा. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होणार नाही. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image