अशी घ्या मुलांच्या लठ्ठपणाची काळजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

 • ज्या मुलींचा BMI (Body Mass Index) आवश्यकतेपेक्षा अधिक असतो, अशा मुलींना मुलांच्या तुलनेत नैराश्य लवकर ग्रासते.
   
 • ​मुलांची उंची आणि वजन यासोबतच त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेडसावणाऱ्या भावनिक समस्यांची माहिती घेतली पाहिजे.

बदलत्या खाण्याच्या पद्धती, मैदानी खेळ खेळण्याचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे. हा लठ्ठपणा पुढे जाऊन नैराश्‍याचे कारण होऊ शकतो. लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांचा फार जवळचा सबंध आहे. 

 • ज्या मुलींचा BMI (Body Mass Index) आवश्यकतेपेक्षा अधिक असतो, अशा मुलींना मुलांच्या तुलनेत नैराश्य लवकर ग्रासते.
   
 • ​मुलांची उंची आणि वजन यासोबतच त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेडसावणाऱ्या भावनिक समस्यांची माहिती घेतली पाहिजे.
   
 • मुलांना अनेकदा आपल्याला आजार जडला आहे, याची माहिती नसते. यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन त्यांना गरज पडल्यास डॉक्टर अथवा समुपदेशकाकडे न्यायला हवे.
   
 • मुलांची उंची आणि वजन यासोबतच त्यांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेडसावणाऱ्या भावनिक समस्यांची पालकांनी माहिती घेतली पाहिजे.
   
 • वयाच्या तिसऱ्या, पाचव्या, सातव्या, अकराव्या आणि चौदाव्या वर्षी मुलांच्या वर्तनात होणारे बदल लक्षपूर्वक पाहिले पाहिजेत.
   
 • सातव्या वर्षापासून लठ्ठपणा आणि भावनिक समस्यांचा एकमेकांशी असलेला संबंध उघड व्हायला सुरुवात होते. त्यापूर्वी या दोन्हींमधला संबंध स्पष्टपणे दिसून येत नाही.
   
 • बऱ्याचदा लोकांना असे वाटते, की कमी खाल्ले आणि अधिक व्यायाम केल्यावर काहीच त्रास होणार नाही. पण हे इतके सोपे नसते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of childrens obesity