प्रमाणातच प्यावा चहा-कॉफी; हे होतात नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

What good in summer tea or coffee

प्रमाणातच प्यावा चहा-कॉफी; हे होतात नुकसान

नागपूर : शरीरासाठी चहा चांगली की कॉफी हा प्रश्न अनेकांना पडतो. यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत. कुणी चहा चांगला असल्याचे सांगतो तर कुणी कॉफी. ही दोन्ही पेय आरोग्यासाठी किती चांगली किंवा वाईट याविषयी उलटसुलट निष्कर्ष असलेली संशोधने वेळोवेळी छापून येत असली तरी चहा-कॉफीचा अतिरेक वाईटच आहे हे मात्र नक्की...

चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखे असते. चहाविना जगणे अशक्य होईल अशी अनेक लोकांना सवय असते. काही जणांना सतत चहा पिण्याची सवय असते. ऑफिसल्या असल्यावर वारंवार चहा घेत असतात. भरपूर काम असले की अनेकांना चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. काही जणांना दर दोन-तीन तासांनी चहा-कॉफी घेण्याची सवय असते. चहा-कॉफीच्या अतिरेकामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यापाठोपाठ इतर आजारांनाही आमंत्रण मिळत असते.

हेही वाचा: नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली; महिनाभरात तीस टक्के भर

मधुमेहासारख्या आजारांत तर साखर न घालताच चहा-कॉफी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे असले तरी जास्त चहा-कॉफी पिऊच नये. सर्वसामान्यांनी दिवसभरात दोन छोटे कप चहा किंवा कॉफी पिणेही भरपूर असते. चहा-कॉफी ही गरज नव्हे; सर्जनशीलतेला चालना देणारी शक्ती नव्हे तर ते आरोग्याला घातक ठरणारे व्यसन आहे. त्यामुळे चहा-कॉफीचे सेवन प्रमाणातच करणे योग्य आहे.

दिवसात किती कप प्यावा चहा

भारतीय लोकांना चहाची तलप मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, एका दिवसात जास्तीत जास्त दोन ते तीन कप चहा योग्य आहे, एक कप चहामध्ये जवळपास २० ते ६० ग्रॅम कॅफिनचे प्रमाण सापडते. हे चहाच्या कपाच्या आकारावर अवलंबून असते. कॅफीन अधिक प्रमाणात शरीरात जाणे आपल्यासाठी घातक ठरू शकते.

साईड ईफेक्ट होणे सहाजिकच

चहामध्ये टॉनिक ॲसिड ६ ते १२ टक्के असते तर कॅफिन नावाचा घटक १.६ टक्के असतो. तसेच थिवोफायलीन असते. हे जेव्हढे हितकारक आहे तेव्हढेच नुकसान दायकसुद्धा आहे. हे घटक आपण डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे योग्य आहे. परंतु, आपण चहाच्या माध्यमातून दररोज सेवन करतो. यामुळे साईड ईफेक्ट होणे सहाजिकच आहे.

हेही वाचा: शिवसेनेला धक्का! निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये

हे आहेत धोके

 • आयरन आणि प्रोटीनवर परिणाम

 • अँटिबायोटिक्स औषधांचा परिमाण होतो कमी

 • पोटाचे विकार

 • गर्भपाताचा धोका

 • चक्कर येणे

 • हृदयाच्या आरोग्यास हानिकारक

 • आतड्यांवर परिणाम

 • ॲसिडिटीचा त्रास

 • निद्रानाश

 • ब्लड प्रेशर वाढते

 • केलोस्ट्रोल वाढतो

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Web Title: Tea Coffee These Cause Damage Contradictory Conclusions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tea