esakal | चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग उसाच्या रसामुळे दूर करा समस्या

बोलून बातमी शोधा

चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग उसाच्या रसामुळे दूर करा समस्या

चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग उसाच्या रसामुळे दूर करा समस्या

sakal_logo
By
शर्वरी जोशी

उन्हाळ्यात अनेक जण किरकोळ शारीरिक समस्यांनी त्रस्त असतात. यात अनेकदा शरीरावर उष्णतेमुळे फोड येणे, सतत घाम येणे, उन्हाळे लागणे, घशाला कोरड पडणे किंवा त्वचेवर लालसर चट्टे उठणे या काही ठराविक समस्या निर्माण होतात. प्रत्येक उन्हाळ्यात त्रासदायक ठरणाऱ्या या समस्यांर अनेक वैद्यकीय किंवा घरगुती उपचार केल्यानंतरही फारसा फरक जाणवत नाही. म्हणूनच मग शरीराती उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात रसदार फळे, फळांचा ताजा ज्यूस अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यामध्येच आज उसाचा रस प्यायल्यामुळे कोणते फायदे होतात ते पाहुयात.

१. उन्हाळ्यात उष्णतेमुळे चेहऱ्यावर फोड येणे ही एक कॉमन समस्या आहे. त्यामुळे या काळात आठवड्यातून तीन वेळा तरी उसाचा रस प्यावा. उसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग दूर होतात. तसंच त्वचा हायड्रेटेड राहते.

२. उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

३. शरीरातील उर्जा टिकून राहते. उन्हाळ्यात अनेकदा थकवा जाणवतो अशा वेळी उसाचा रस प्यावा. हे एक उत्तम नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे.

४. उसाच्या रसामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते.

५. दातांचं इन्फेक्शनही कमी होतं.

६. कावीळ झाल्यास उसाचा रस दिला जातो.

७. खोकला, दमा किंवा किडनीशी संबंधित तक्रारी दूर होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)