esakal | ३० मिनिटं चालण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे...  ते जाणून घ्याच. 
sakal

बोलून बातमी शोधा

These are the wonderful benefits of walking for 30 minutes

आपण प्रातःकाळी लवकर उठून ३० मिनिटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर त्याबद्दल तुमचे अपार अभिनंदन आहे. कारण आपण दीर्घायुष्यी आहात व आपले आजारी पडण्याचे प्रमाण अल्प आहे. तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे . 

३० मिनिटं चालण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे...  ते जाणून घ्याच. 

sakal_logo
By
प्राजक्ता निपसे

एकही पैसा खर्च न करता होणारा व्यायाम प्रकार म्हणजे मॉर्निंग वॉक होय . 

१  सर्वाना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार

२  कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार

३  शरीर तंदुरुस्त, निरोगी  ठेवण्यासाठीचा हा  व्यायाम प्रकार

४  सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. 

५  हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हात असते ते मिळते. 

६  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. 

७  सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

८  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते.

९  चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

१०  मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

११  वजन कमी करण्यास मदत होते.

१२ चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात.

१३  चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

१४  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.

१५  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.

१६  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो.

१७ नियमित चालण्याची सवय असणा-यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी असते.

१८  नियमित चालणा-यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

१९ नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

२०  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते

२१  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.

२२  नियमित चालण्यामुळे कंबर, मांडया, पायाचे स्नायू मजबूत होतात.

२३  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

२४  नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो.

२५  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग

२६  चालण्यातून डिप्रेशनची  पातळी खाली येण्यास मदत तर होते.

हेही वाचा : एसबीआय बँकेच्या ऑनलाइन बँकिंगसाठी काही सुरक्षित टिप्स...  

२७  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे तुमचे सरासरी आयुष्य तीन वर्षानी वाढते.

२८  नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

२९  चालण्याचा व्यायाम करताना  वयाचा अडथळा कधीही येत नाही. वय जरी नव्व्द असले तरीही ती व्यक्ती चालू शकते. फक्त त्यांना झेपेल एवढेच चालायला हवे.

संपादन - सुस्मिता वडतिले  

loading image