शरीरातील पुढील लक्षणं देतात मधुमेहाच्या त्रासाची पूर्वसूचना; आजच ओळखा आणि भेटा डॉक्टरांना  

these symptoms gives warning of diabetes
these symptoms gives warning of diabetes

नागपूर - आपल्याला कुठलाही आजार होण्यापूर्वी शरीरात काही बदल होत असतात. ते आपल्याला जाणवात. त्याकडे वेळीच लक्ष दिलं तर आजार फोफावत नाही. मात्र, आपण दुर्लक्ष केलं तर गंभीर स्वरुपाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मधुमेह होण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. काही लक्षणं दिसल्यास आपण लगेच उपचार करायला पाहिजे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील.

आपल्या देशातील कोट्यवधी लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. एका अभ्यासानुसार, जगातील ४२ कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराला बळी पडले आहेत. 

मधुमेहापूर्वी शरीरात होणारे बदल -

झोपेचा अभाव – सकाळी उठल्यानंतर झोप पूर्ण झाली नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर हे मधुमेहाचे पहिले लक्षण असू शकते. 

चिडचिडपणा – कधी-कधी आपण फार चिडचिड करतो. मात्र, हे नेहमी नेहमी होत असेल तर मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सारखा ताप येणे - एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल. फक्त सर्दी झाली तरी तपास येत असेल तर हे देखील मधुमेहाचे एक लक्षण असू शकते.

वारंवार भूक लागणे – जेवल्यानंतरही तुम्ही सारखं काही ना काही खात असाल. तसेच तुम्हाला वारंवार भूक लागत असेल. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खावे वाटत असेल तर नक्कीच हे मधुमेहाचे लक्षण आहे.

वारंवार लघवी येणे – एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवीला जाण्याची समस्या होत असेल तर त्याला मधुमेह तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. आपल्याला खूप तहान लागत असेल आणि सतत बाथरूममध्ये जावे लागले असेल तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा, कारण हे टाइप -2 मधुमेहाचे लक्षण असू शकते.

जखम लवकर न भरणे – आपल्याला एखादी साधी जखमी झाली असेल तर ती भरण्यास जास्त वेळ लागत नाही. मात्र, मधुमेह असलेल्या रुग्णाची जखमी लवकर भरत नाही. तुमच्या शरीरारवरील जखमी भरायला वेळ लागत असेल तर नक्कीच तुमच्या साखरेच्या पातळीत वाढ झालेली असू शकते.

अचानक वजन कमी होणे – जर आपण चांगले खाणे-पिणे करीत असाल, परंतु तरीही अचानक आपले वजन कमी होत असेल तर काळजी घ्या. कारण ते मधुमेहाचे लक्षण असू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com