महाबली हनुमानाला का घ्यावा लागला होता वानर रूपात जन्म? ; आख्यायिका वाचून व्हाल थक्क 

टीम ई सकाळ  
Tuesday, 29 September 2020

पौराणिक कथानुसार पवनपुत्र हनुमानाची आई माता अंजनी ह्या आपल्या पूर्वीच्या जन्मात देवराज इंद्र यांच्या महालातील अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदम चपळ आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्या इंद्र्दार्बरी होत्या

नागपूर : भारतीय पौराणिक कथांच्या अनुसार ७ दिव्य आणि अमर पुरुषांपैकी एक हनुमान म्हणजेच महाबली मारुती आहेत हे आपण ऐकलंच असेल. हनुमानावर अनेकांची श्रद्धा आहे. महाबली आणि सामर्थ्यशाली हनुमानाने सीता मातेला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामांची मदत केली होती. त्यावेळी संपूर्ण वानरसेना लढली होती. पण हनुमानाच्या जन्माची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?  महादेवाच्या या अवताराला वानर रूपात जन्म का घ्यावा लागला? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.    

पौराणिक कथानुसार पवनपुत्र हनुमानाची आई माता अंजनी ह्या आपल्या पूर्वीच्या जन्मात देवराज इंद्र यांच्या महालातील अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदम चपळ आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्या इंद्र्दार्बरी होत्या. एकवेळी त्यांनी आपल्या चंचलतेमुळे तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या एका ऋषीसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा ऋषीमुनीने रागात तिला श्राप दिला कि तू वानरीच्या रुपात आयुष्य जगशील.

मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक

त्यानंतर पुंजीकस्थलाने क्षमायाचना करत ऋषीकडे आपला श्राप वापस घेण्याची विनती केली. तिला आपल्या चुकीची जाणीव झालीय हे पाहून ऋषींनी दया दाखवत सांगितले की तुझा जन्म वानर कुळात होईल आणि तू एक खूप कीर्तिवान, यशस्वी पुत्राला जन्म देशील.

ऋषींनी श्राप दिल्यांनतर एके दिवशी इंद्र्देवाने पुंजीकस्थलाला वर मागण्यास सांगितले.  तेव्हा पुंजीकस्थलाने इंद्रदेवाला सांगितले जर शक्य असेल तर मला ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापातून मुक्त करा. इंद्र्देवाने पूर्ण वृतांत एकल्यानंतर सांगितले की तूला पृथ्वी लोकात जाऊन वास्तव्य करावे लागेल. तेथे तुला एका राजकुमाराशी प्रेम होईल आणि तो तुझा पती बनेल. विवाहानंतर तू  महादेवांच्या अवताराला जन्म देशील आणि या श्रापातून तुझी मुक्तता होईल.

इंद्रदेवांचा आदेश मानून पुंजीकस्थला “अंजनी” च्या रुपात धरतीलोकात वास्तव्य करू लागली. एकदा तिला एक युवक दिसला ज्याच्याकडे ती आकर्षित झाली. जसेही त्या युवकाने अंजनीकडे बघितले की लगेच अंजनीचा चेहरा वानराचा झाला. अंजनीने त्या युवकापासून आपला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्या युवकाने अंजनीचा चेहरा पहिला तेव्हा तो आनंदून गेला. 
अंजनीने युवकाकडे पहिले तर तोसुद्धा वानर रुपात होता. युवकाने अंजनीला सांगितले कि मी वानरराज केसरी आहे. आणि जेव्हा वाटेल तेव्हा मनुष्य रूप धारण करू शकतो. दोघानंही एकमेकांवर प्रेम झाले होते आणि दोघेही विवाह बंधनात अडकले.

झाला अंजनीपुत्राचा जन्म 

विवाहानंतर अनेक वर्ष बिना संततीचे राहिल्यानंतर अंजनी मातंग ऋषीकडे जाऊन पोहचली. आणि त्यांना आपले दुखः सांगितले. तेव्हा मातंग ऋषीने तिल नारायण पर्वतावर स्थित असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन १२ वर्ष उपवास करून तप करण्यास सांगितले. तपादरम्यान वायुदेवाने अंजनीच्या तपावर खुश होऊन वरदान दिले कि तिला अग्नी,सूर्य ,वेदाचा मर्मज्ञ आणि वीर बलशाली
पुत्र प्राप्ती होईल.

त्यांतर अंजनीने भगवान महादेवाची कठोर आराधना केली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागितल्यास सांगिते. तेव्हा अंजनीने ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापाची गोष्ट सांगितली कि मला या श्रापातून मुक्त व्हायचे असेल तर महादेवाच्या अवताराला मला जन्म द्यावा लागेल त्यामुळे कृपा करुन तुम्ही बालरूपात माझ्या गर्भात जन्म घ्या.

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

महादेवांनी अंजनीला आशीर्वाद दिले आणि हनुमानाच्या रुपात अंजनीच्या गर्भातून जन्म घेतला. आणि अशा रीतीने  महादेवांना ऋषीच्या श्रापातून अंजनाला मुक्त करण्यासाठी हनुमान रुपी वानररुपात जन्म  घ्यावा लागला. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know the story behind birth of lord hanumana