esakal | टिप्स : पथ्ये पाळा, निश्चिंत राहा...
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Care

टिप्स : पथ्ये पाळा, निश्चिंत राहा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावसाळा म्हटला की, दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास आजाराची काळजी करावी लागणार नाही. पावसाळ्यात पसरणारी अस्वच्छता आणि त्यातून उद्‍भवणारे आजार डोके वर काढू लागतात. सध्याचा कोरोनाचा काळ आणि पावसाळ्याच्या दिवसात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ

हे करा...

 • पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवा.

 • घरातील हौद, टाक्या, माठ, हंडे, पिंप, बादल्या स्वच्छ ठेवा

 • घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.

 • दात, जीभ व तोंड हे अवयव दररोज नियमितपणे स्वच्छ ठेवा.

 • फळभाज्या किंवा पालेभाज्या निर्जंतुक करण्यासाठी त्या मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवा.

 • सतत बदलते हवामान, वातावरणातील कोंदटपणामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. ते टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

 • वनौषधीयुक्त चहा, जिवाणूविरोधी गुणधर्म असलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवर्जून घ्या.

 • नियमित सकस, ताजे आणि शक्‍यतो गरम आणि पचायला हलके जेवण घ्या.

हे टाळा..

 • उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.

 • हात स्वच्छ धुतल्याशिवाय कोणताही पदार्थ खाऊ नये.

 • नासलेले किंवा शिळे अन्न खाऊ नये.

 • बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.

 • हरभराडाळ, उडीदडाळ यांचे पदार्थ नकोत.

काय काळजी घ्याल?

 • पावसाळ्यात प्रामुख्याने पाणी खराब होते. त्यामध्ये जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात असतो आणि ते पचायलाही जड असते. यासाठी पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. उकळताना त्यामध्ये एक चिमूट सुंठ आणि चार ते पाच वावडिंग घालावेत.

 • खाण्यामध्ये गरम व पातळ अन्न ही पावसाळ्यातील आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

 • भाज्यांची सूप्स, मुगाची आमटी, पाणी घालून केलेली मूग आणि मसुराची उसळ घ्यावी.

 • पावसाळ्यात पचनाची क्रिया मंद होते. त्यामुळे एका वेळी पूर्ण आणि पोटभर जेवण करण्यापेक्षा दिवसातून चार वेळा थोडे थोडे खावे.

 • दिवसातून दोन वेळा अर्धा ग्लास गरम पाणी प्यावे.

loading image