कोमल अन् मुलायम त्वचा हवीय? वापरा 'हे' नुस्खे अन् बघा चमत्कार

टीम ई सकाळ
Sunday, 21 February 2021

त्वचा कोरडी पडल्याने अनेकदा त्याला भेगाही पडत असतात. त्यामुळे त्वचेला हॉयड्रेट करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

नागपूर : थंडीच्या दिवसात सर्वात मोठी समस्या म्हणजे त्वचेच्या समस्या आहेत. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण ग्रस्त असतात. त्वचा कोरडी पडल्याने अनेकदा त्याला भेगाही पडत असतात. त्यामुळे त्वचेला हॉयड्रेट करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

गरम पाण्याचा वापर कमी करा -
हिवाळ्यात थंडी जास्त असल्याने आपण जास्तीत जास्त गरम पाण्याचा वापर करत असतो. मात्र, ते आपल्या त्वचेसाठी धोकादायक असते. फक्त चेहऱ्यावरीलच त्वचा कोरडी पडत नाही, तर पूर्ण शरीरावरील त्वचा गरम पाण्यामुळे कोरडी पडते. गरम पाण्यानी आंघोळ केल्यानंतर काही वेळानंतर त्वचा बघा. तुम्हाला पूर्ण त्वचा कोरडी पडलेली दिसेल. त्यामुळे आंघोळ झाल्याबरोबर संपूर्ण शरीराला मॉश्चराईज करायला विसरू नका.

हेही वाचा - तुमचे दात वेडवाकडे आहेत का? मग चुकूनही खाऊ नका 'हे' खाद्यपदार्थ

चांगल्यारितीने मॉश्चराईज करा -
मॉश्चराईज हिवाळ्यामध्ये त्वचेसाठी रामबाण उपाय असतो. आंघोळ केल्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने त्वेचला कोरडे करा. मात्र, टॉवेलने त्वचेला खूप घासू नका. काही प्रमाणात ओलसर त्वचा ठेवा. त्यानंतर लगेच मॉश्चराईज लावा. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही.

आंघोळीच्या पाण्यात एक चमचा तेल टाका -
तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर आंघोळीच्या पाण्यात नारळाचे तेल किंवा बेली ऑईल घाला. त्यामुळे तुमची त्वचा नेहमीसाठी ओलसर राहण्यास मदत होईल.

हायड्रेट स्कीन प्रोडक्ट वापरा -
तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जी क्रीम वापरत त्यामुळे त्वचेवरील रोम छिद्र बुजणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. तसेच आपले ओठ देखील फार कोरडे पडतात. ओठांना जीभेने सारखा स्पर्श केल्यास त्यावर सूजन देखील येत असते. त्यामुळे एक चांगले लिप बाम घेऊन ओठांना मॉश्चराईज करणे गरजेचे असते.

हेही वाचा - 'हे' चार संकेत सांगतात तुमची लहान मुले योग्यप्रकारची अ‌ॅक्टिव्हीटी करतात की नाही?

सनस्क्रीन -
हिवाळ्यात सूर्याचं उन तितकं प्रखर नसते. त्यामुळे अनेकजण सनस्क्रीनचा वापर करणे सोडून देतात. मात्र हिवाळ्यातही सनस्क्रीन लावायला विसरू नका. बाहेर पडण्याच्या २० मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा. त्यामुळे काही प्रमाणात असलेल्या सूर्यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल. 

त्वचेवर फेस मास्कचा वापर करणे -
तुम्ही चांगले फेसवॉश, मेकअप रिमव्हूवर, क्लींजरचा वापर करून त्वचेला मॉश्चराईज करत असता. त्यामुळे त्वचेवर जमलेली धूळ निघण्यास मदत होते. अनेक फेस मास्कचा पण वापर करतात. मात्र, हे आठवड्यातून एकच वेळा करावे. आठवड्यातून दोन-तीन वेळा केल्यास त्वचेला धोका निर्माण होऊ शकतो.

भरपूर पाणी प्या -
त्वचेसंबंधी अर्ध्यापेक्षा अधिक रोग जास्त प्रमाणात पाणी पिल्यानेच जातात. मात्र, अनेकजण पाणी योग्य प्रमाणात पीत नाहीत. जास्त पाणी प्यायल्यास पाणी शरीराला हायड्रेट करते. त्यामुळे त्वचा चमकायला लागते. 

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tips for soft skin nagpur news