esakal | निरोगी यकृत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

liver
निरोगी यकृत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घ्या
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: यकृत (लिवर) हे आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. हा शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. लिवरमध्ये अनेक एंजाइम बनते. ही एंजाइन पचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पण जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम लिवरवर होतो. त्यामूळे जर आपले लिवर निरोगी असेल तर तुम्ही निरोगी राहू शकाल. निरोगी लिवर ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे ते जाणून घेऊया.

१. लसून-

लिवर चांगले ठेवण्यासाठी आहारात लसनाचा समावेश केला पाहिजे. तसेच ते शरीरातील फॅट कमी करण्यासाठीही होतो. नियमितपणे आहारात लसनाचा समावेश केल्यास फॅटी लिवरची चिंता कमी होऊ शकते.

२. पाणी-

आपण जर रोज योग्य प्रमाणात पाणी पिल्यास त्याचा निरोगी राहण्यास मोठा फायदा होतो. मुबलक प्रमाणात पाणी पिल्यास तुमचे लिवरही चांगले राहू शकते. तसेच तुमच्या आहारात विविध फळांच्या ज्सूसचा समावेश केला तर त्याचा फायदा निरोगी राहण्यासाठी होऊ शकतो.

३. फॅटी ऍसीड-

ही अशी एक गोष्ट आहे ज्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. असा आहार घेऊ नका जो शरीरात पचवण्यास त्रास होईल. जास्तीचे सॅचुरेटेड फॅट असणारी पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

४. बीट-

यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरते. यामध्ये बीटाकॅराटिन आणि फ्लेवोनाईड्स असते. हे लिवरसाठी चांगले आरोग्यदायी ठरते.