Sleep Snorer
Sleep Snoreresakal

Health News : घोरण्याची कारणे नक्की आहेत तरी काय? जाणून घ्या

प्रत्येक माणूस आपल्या जीवनातील एक तृतीयांश भाग हा झोपेत घालवत असतो.
Summary

घोरण्याच्या आजारामुळे हृदयविकार आजारांचा धोकादेखील वाढू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

-डॉ. सायली फडके

प्रत्येक माणूस आपल्या जीवनातील एक तृतीयांश भाग हा झोपेत घालवत असतो. झोपेत घोरणारा (Sleep Snorer) किती गाढ झोपला आहे, असं वाटू शकतं; पण खरचं तसं असतं का? सर्वांच्याच बाबतीत ते खरं नसतं. काहीजणांमध्ये हे घोरणे घातक ठरू शकते. झोपेत घोरणेही सवय नसून ते एका आजाराचे लक्षण आहे. झोपेत असताना माणसाच्या श्‍वसनाला विरोध होतो. श्‍वसनाचे तीन प्रकार असतात. अवरोधीश्‍वसन-यामध्ये श्‍वसनरोधाच्या एकूण बाधितांपैकी निम्म्याहून अधिक बाधितांचा समावेश असतो.

केंद्रीय श्‍वसनरोध- जवळपास एक टक्के श्‍वसनरोधित रुग्णांना हा प्रकार असतो. यात श्‍वसनाचा प्रयत्नच केला जात नाही. मानवी मेंदू (Brain) श्‍वसनाची क्रिया करण्याचा आदेशच देण्यास विसरतो. मिश्र श्‍वसनरोध-वरील दोनही प्रकारचा त्रास असणाऱ्‍या रुग्णांना हा आजार असतो. माणूस घोरताना नक्की काय होते, हे समजून घेऊया. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. मऊ टाळू, जीभ, पडजीभ याचबरोबर श्‍वसननलिकाही सुस्तावल्यामुळे अरूंद झालेली असते.

Sleep Snorer
आरोग्यशास्त्र : घोरणे : आजारांचे सूचक

या वेळी आपण श्‍वास घेतो त्या वेळी तो या अरूंद श्‍वासनलिकेतून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थातच त्या अरूंद नलिकेतून जाताना विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर होऊन ते फडफडू लागतात. त्याचा हा जोराचा आवाज होतो आणि तो घोरण्याच्या स्वरूपात आपल्याला ऐकू येतो. घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही तर घोरणाऱ्‍या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. झोपेत वारंवार श्‍वसन बंद पडते. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.

परिणामी, झोप वारंवार चाळवली जाते. मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. झोपमोड होऊन मेंदू वारंवार जागा होतो. झोपेतून उठल्यावर सकाळी उत्साही न वाटणे, सतत चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी होणे. मूडमध्ये बदल होत राहणे, दिवसभर कंटाळवाणे वाटणे, दिवसभर कधीही झोप लागणे, जागे झाल्यावर घशास, तोंडाला कोरड पडणे, झोपेत खूप घाम येणे, सतत वाईट स्वप्ने पडणे, अशी लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात.

Sleep Snorer
Budget : 'अर्थसंकल्प' म्हणजे भविष्यातील आर्थिक शिस्तीचं 'बाळकडू'

घोरण्याची कारणे नक्की आहेत तरी काय?

अतिलठ्ठपणा, अनुवंशिकता, अतिधुम्रपान, अतिमद्यपान, नाकाचे हाड वाकडे/वाढलेले असणे, नाकामागच्या गाठी (Adenoids) वाढलेल्या असणे, बदलती जीवनशैली, रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे. घोरण्याच्या या आजारामुळे हृदयविकार इ. आजारांचा धोकादेखील वाढू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. याचे निदान व उपचार- रुग्णासोबत झोपणाऱ्‍या व्यक्तीला डॉक्टर स्लिप हिस्टरी विचारतात आणि त्याचे मुल्यांकन करतात.

श्‍वासोच्छवास आणि इतर शरीराच्या कार्यावर रात्रभर लक्ष ठेवून स्लिप अ‍ॅप्नियाचे निदान होण्यास मदत मिळते. पॉलिसोम्नोग्राफी या टेस्टमध्ये रात्री झोपतानाचे श्‍वासोच्छवासाचे नमुने, रक्तातील ऑक्सिजनची पातळी, हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या क्रियाकलापाचे परीक्षण केले जाते तसेच श्‍वसनरोधामध्ये कोणत्या स्तरावर कोणत्या अवयवामुळे विरोध होत आहे हे तपासण्यासाठी Sleep Endoscopy (Diagnostic) (DSE) केली जाते. या सर्व चाचण्यांचे मुल्यांकन करून पुढील उपचार केले जातात.

Sleep Snorer
घोरणे वाढले, झोप बिघडली...

कमी प्रमाणाचा आजार असेल तर

जीवनशैलीमध्ये बदल, वजन कमी करणे, धुम्रपान सोडणे, मद्यपान टाळणे, वरच्या श्‍वसनमार्गातील अडथळा दूर करणे (नाकाच्या पडद्याचे ऑपरेशन, टॉन्सिलेक्टॉमी, अ‍ॅडिनॉइडेक्टॉमी). गंभीर प्रकरणांमध्ये- एक मास्क, मशिन दिले जाते. जीभ जागेवर ठेवण्यासाठी झोपताना मौखिक साधनांचा वापर केला जातो. शस्त्रक्रिया, यूपीपीपी- युव्ह्युलोपॅलॅटोफॅरिंगोप्लास्टी. लेसर असिस्टेड युव्ह्युलोपॅलॅटोफॅरिंगोप्लास्टी (LAUP). सोम्नोप्लास्टी- अतिरिक्त Tissue काढण्यासाठी लोलेव्हल रेडिओफ्रिक्वेंसीचा वापर. टाळूचे Implants. खालच्या जबड्याची पुनर्स्थापना.

(लेखक डॉ. स्वस्तिक हॉस्पिटल येथे कान, नाक, घसातज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com