Arthritis Symptoms
Arthritis Symptomsesakal

Arthritis Symptoms : सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठं नुकसान होईल!

एक किंवा अनेक सांध्यांना सूज येणे त्याला संधिवात किंवा आर्थरायटीस (Arthritis) म्हणतात.
Summary

शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यावर सांधे, हृदय व किडनीचे विकार उद्भवतात, ज्यात मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते.

-डॉ. नितीन रमेश चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ (nitin२२२५५@gmail.com)

सांधेदुखी (Arthritis Symptoms) म्हणजे शरीरातील कोणत्याही भागातील सांध्यामध्ये जाणवणारी वेदना किंवा अस्वस्थता. दोन किंवा अधिक हाडे (Bones) एकत्र येऊन शीर, स्नायू व कुर्ची यांच्यासहित सांधा तयार होतो. खुबा, गुडघा, कोपर किंवा खांदा. यापैकी कोणत्याही एक किंवा जास्त घटकाला त्रास झाला तर सांधेदुखी उद्भवू शकते. सांधेदुखी हालचालींवर मर्यादा आणू शकते किंवा त्याशिवायसुद्धा होऊ शकते. विविध प्रकारचे सौम्य किंवा गंभीर आजार, विकार अथवा इजा यामुळे असा त्रास निर्माण होऊ शकतो. सांधेदुखी अचानक उद्भवू शकते किंवा जुनाट -३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची असू शकते.

Arthritis Symptoms
Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

एक किंवा अनेक सांध्यांना सूज येणे त्याला संधिवात किंवा आर्थरायटीस (Arthritis) म्हणतात. वेदना झाल्या की संधीदाह होतो. भारतातील १५ टक्के लोकांना हा त्रास आहे. त्यात सांध्याच्या आसपास असलेल्या पेशी व कनेक्टिव्ह पेशींना सूज येते. सांधेदुखी वाढत्या वयाबरोबर होणारा त्रास आहे, आजार नव्हे. जसे एखाद्या यंत्राच्या गिअर्समध्ये गिअर ऑईल असते. तसेच सांध्यामध्ये द्रवपदार्थ असतो. त्याचे प्रमाण वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. सांध्यांच्या हाडांवर असलेले आवरण झिजते व त्याची शॉक सहन करून शोषून घ्यायची क्षमता कमी होते. याचा परिणाम म्हणून हाडे एकमेकांना घासतात व संधिवाताला सुरवात होते.

कारणे :

  • कोणत्याही प्रकारची दुखापत : मुरगळणे, सांधा निखळणे, अस्थिभंग ( फ्रॅक्चर), खेळांमुळे होणाऱ्या दुखापती (स्पोर्टस्‍ा्‍ इंज्‍युरी), सांध्यांची शस्त्रक्रिया

  • संसर्गजन्य कारणे ः सेप्टिक संधिवात, गालगुंड, हेपाटायटीस, फ्लूसदृश ताप, रुबेला, क्षयरोग,

  • डिजनेरटीव्ह, दाहयुक्त स्वयंप्रतिकार संधिवात

  • ऑस्टिओआर्थरायटीस

  • सोरायसिस

  • फायब्रोमायलजिया

  • अंकिलोजिंग स्पाँडीलायटीस

  • गाऊट ः ऋमॅटोईड आर्थरायटीस

  • इतर कारणे - हाडांचा कर्करोग, हिमोफिलिया, हायपरपॅराथायरॉईडीझ

Arthritis Symptoms
Depression in Children Symptoms : लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतंय नैराश्य; काय आहेत कारणे?

प्रमुख पाच लक्षणे

सांधा दुखणे ः एक किंवा अनेक सांध्यांना सूज येणे, सांध्यात ताठरता येणे. सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यावर सांध्यांमध्ये कडकपणा जाणवतो जो एका तासापेक्षा जास्त काळ टिकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना दैनंदिन कामे दाराची कडी लावणे, केस विंचरणे, कपडे घालणे हे कठीण होते. सांध्यावरील किंवा आजूबाजूचा भाग लालसर होणे. हालचाल करण्यात मर्यादा येणे याचा सर्वाधिक हानिकारक प्रभाव म्हणजे शारीरिक गतिशीलतेवर परिणाम होतो. सांध्यांची झीज होऊन लवचिकता कमी होते व हालचालींवर मर्यादा येतात. अशांना आधारासाठी काठी किंवा वॉकरचा उपयोग करावा लागतो.

सततच्या वेदना व अस्वस्थता यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. नैराश्य, चिडचिडेपणा, एकटेपणा व प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. ऋमॅटोईड आर्थरायटीस यात शरीरातील एकापेक्षा अधिक सांध्यांमध्ये वेदना होतात. सकाळी उठल्यावर ताठरता जाणवते (morning stiffness). सर्व वयोगटांत हा त्रास होऊ शकतो व यासाठी औषधे बऱ्याच कालावधीसाठी घ्यावी लागतात. भूक कमी लागणे, अस्वस्थ वाटणे आणि थकवा जाणवणे हीसुद्धा याचीच लक्षणे आहेत. इतर अवयवांना हा त्रास होतो (त्वचा, डोळे, हृदय, फुफ्फुस व रक्तवाहिन्या). महिलांना पुरुषांच्या तिप्पट हा त्रास होतो.

आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन सांध्यांच्या पेशींवर हल्ला करून नाश करते. त्यामुळे सांधे व्याधीग्रस्त होतात. ६० वर्षांवरील महिलांना त्रास जास्त प्रमाणात होतो. याची कारणे अनेक आहेत. रिऍक्टिव्ह इम्युनिटी असल्याने रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार जास्त होतात. शरीरातील हॉर्मोन्समुळे ऋमॅटोईडचा त्रास वाढतो. मासिक पाळी, गर्भावस्थेत व मेनोपॉज यामध्ये प्रामुख्याने आढळून येते. महिलांचे खुबे रुंद असल्याने गुडघ्याच्या alignment वर परिणाम होऊन झीज जास्त होते.

Arthritis Symptoms
Endometriosis Symptoms : 'एंडोमेट्रिओसिस' हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो; कशी घ्याल काळजी?

प्रसूतीनंतर पाठ, कंबर व गुडघे यात जास्त वेदना होतात. ऑस्टिओ आर्थरायटीसचा साधारण पन्नाशीनंतर त्रास सुरू होतो. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रमाणात होतो. गुडघे आपल्या शरीराचे वजन पेलवतात. भारतीय पद्धतीने टॉयलेटला किंवा मांडी घालून खाली बसल्यावर उठताना काही क्षणांसाठी गुडगघ्यांवर आलेल्या वजनामुळे झीज जास्त प्रमाणात होते. वंगण कमी होऊन हाडे घासतात व सूज येऊन दुखणे सुरू होते.४० टक्के लोकांना हा त्रास असतो.

शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यावर सांधे, हृदय व किडनीचे विकार उद्भवतात, ज्यात मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. मांसाहार व मध्यपान करणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो. इडिओपॅथिक अर्थरयटीस लहान मुलांना होतो. १६ वर्षांखालील मुलांना रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने विषाणू निरोगी पेशींवर हल्ला करून नुकसान करतात, त्यामुळे हा त्रास होतो. अंगावर पुरळ उठून खाज येणे, भूक कमी लागणे, ताप येणे, सांधे गरम होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे होणाऱ्या वेदना कमी करता आल्या पाहिजेत व त्याचबरोबरीने अवयव आणि सांध्यांची हालचाल सुरू ठेवली पाहिजे. हिवाळ्यात हा त्रास जास्त जाणवतो.

Arthritis Symptoms
वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर आईसह बाळाचा मृत्यू; रक्तस्त्रावाने प्रकृती बनली होती गंभीर

निदान : रक्ताच्या तपासण्या - ऋमॅटोईड संधिवात किंवा सिस्टमिक लुपसमुळे होणारा संधिवात याचे निदान होऊ शकते. तज्ज्ञांकडून निदान करून घेणे नेहमीच इष्ट ठरते. रुग्णांची लक्षणे व शारीरिक तपासणी करून त्याच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती करून घेतात. सांध्यांची झीज किंवा मूल्यांकन करण्यासाठी एक्स रे तपासणी केली जाते. गरज भासल्यास सांध्याची सोनोग्राफी किंवा एम आर आय स्कॅन तपासणीचा पर्याय सुचवले जातात.

उपचार

इतर व्याधींवर मधुमेह, रक्तदाब, दमा उपचार करणे.

औषधोपचार - वेदनाशामक व सूज कमी करण्यासाठी औषधे.

वजन कमी करण्याचा सल्ला - आहार व व्यायाम, जीवनशैलीत बदल - कमोड, वॉकर, काठीचा वापर.

अस्थिरोग तज्ज्ञांकडून व फिजिओथेरपिस्ट कडून मार्गदर्शन - कोणते व्यायाम आणि किती प्रमाणात करावे याचा सल्ला.

(लेखक चिरायु हॉस्पिटल येथे अस्थिरोगतज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com