Oral Cancer Symptoms
Oral Cancer Symptomsesakal

Oral Cancer Symptoms : कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? Cancer नक्की कशामुळं होतो? जाणून घ्या..

कर्करोग (Cancer) म्हटलं की, माणसाच्या मनात थोडीशी का होईना भीतीही असतेच.
Summary

तोंडाचा कर्करोग हा जगातील सर्व कर्करोगांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला तर भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेला कर्करोग आहे.

-डॉ. सायली फडके, कान, नाक, घसातज्ज्ञ (Email.ID- sayali१००@gmail.com)

कर्करोग (Cancer) म्हटलं की, माणसाच्या मनात थोडीशी का होईना भीतीही असतेच. बऱ्‍याचदा पेशंट्स ‘डॉक्टर हे तसले तर काही नाहीना? तसा विषय तर नाहीना? असे काळजीपूर्वक विचारतात. तेव्हा त्यांना कर्करोग म्हणजेच कॅन्सर तर नाहीना, असे विचारायचे असते; पण हा शब्द उच्चारण्यालासुद्धा ते घाबरतात. आजकाल पेशंटसमध्ये कॅन्सर फोबिया म्हणजेच कॅन्सर होण्याची भीती बऱ्‍याच अंशी बघायला मिळते. असा हा कॅन्सर नक्की कशामुळे होतो, ते जाणून घेऊया....!

Oral Cancer Symptoms
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

आपल्या शरीरात सतत जुन्या पेशी मरून त्या जागी नवीन पेशी तयार होत असतात. या पेशींचे सतत विभाजन होत असते. हे विभाजन काही जनुकीय बदलांमुळे जर अनियंत्रित झाले किंवा थांबलेच नाही तर नवीन पेशींची अनियंत्रित वाढ चालूच राहते. अशा पेशी त्यांचे कार्य व्यवस्थित पार पाडत नाहीत तर शरीराला अपायकारक बनतात. यालाच आपण कॅन्सर (Oral Cancer Symptoms) झाला, असे म्हणतो.

तोंडाचा कर्करोग हा जगातील सर्व कर्करोगांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला तर भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेला कर्करोग आहे. भारतातील सर्व कर्करोगांपैकी ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे आढळून येतात. तोंडाच्या कर्करोगामध्ये ओठ, जीभ, जबडा, हिरड्या, गाल, टाळू तसेच दातामागची खोबणी म्हणजेच रोट्रोमोलार ट्रायगोन या अवयवांचा समावेश होतो.

Oral Cancer Symptoms
Mental Health : ..तर बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकतं; यासाठी कशी काळजी घ्याल?

कारणे

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे कोणत्याही स्वरूपातील अतिरिक्त सेवन. बीडी, सिगरेट, चिलीम यांचे सेवन. दारूचे व्यसन हे म्हणजे पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शनच. लागणारा किंवा टोचणारा दात, सतत लागणारी किंवा लूज झालेली कवळी. तोंडात बरेच दिवस असलेली न भरणारी जखम, व्हिटॅमिनसची कमतरता, तोंडात असणारा पांढरा किंवा लाल चट्टा...ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजेच तोंडाची त्वचा जाड होणे.

लक्षणे

तोंडामध्ये गाठ असणे, तोंडामध्ये जखम किंवा अल्सर येणे, जिभेला हिरड्यांना किंवा टाळूला सूज येणे, तोंड कमी उघडणे, वेदना होणे, हिरड्यांमधून वारंवार रक्त येणे, एखादा दात अचानक लूज होणे, वजन कमी होणे, तिखट न लागू देणे, गिळताना त्रास होणे, मानेमध्ये गाठी वाढणे अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे गरजेचे असते. या प्रकारची गाठ असेल तर ती कॅन्सरची गाठ आहे का, हे खात्री करण्यासाठी बायोप्सी घेतली जाते.

Oral Cancer Symptoms
Frozen Shoulder Symptoms : फ्रोझन शोल्डरपासून मिळवा मुक्ती, फिजिओथेरपीमुळे पुनश्‍च येई शक्ती।

त्यामध्ये गाठीचा छोटासा तुकडा काढून तो पुढील तपासणीसाठी पाठवला जातो तसेच मानेमधील गाठी वाढल्या असतील तर त्यांची सोनोग्राफी करून किंवा सुईने गाठीतील पाणी काढून त्याचा तपास करता येतो (FNAC-Fine Needle Aspiration) या व्यतिरिक्त मानेचे सीटीस्कॅन करून देखील कर्करोगाचे निदान करता येते तसेच किती प्रमाणात पसरला आहे हे सुद्धा तपासता येते. एकदा का कर्करोगाचे निदान झाले की, कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे त्यावर बरीचशी ट्रीटमेंट ठरते. या स्टेजेसमध्ये कर्करोग किती प्रमाणात पसरलेला आहे यावर अवलंबून असतात. स्टेज १.२ व अगदी ३ पर्यंतचे कॅन्सर पूर्णपणे बरे होतात. स्टेज ४ चे कॅन्सर मात्र पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत. कारण, तोपर्यंत ते सगळ्या शरीरामध्ये पसरलेले असतात.

स्टेज वन व टूमध्ये ऑपरेशन करून गाठीचा व कॅन्सरचा भाग काढला जातो. त्याचबरोबर स्टेज थ्रीमध्ये ऑपरेशनबरोबर किमोथेरपी व रेडिओथेरपी दिली जाते. काही कॅन्सरमध्ये आधी किमोथेरपी देऊन गाठीचा आकार कमी केला जातो व नंतर ऑपरेशन केले जाते. कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करायची हे कॅन्सरची स्टेज, पेशंटची त्या वेळी असणारे शारीरिक स्थिती अशा बऱ्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. कॅन्सरचा जो भाग काढलेला आहे त्या भागामध्ये reconstructive प्लास्टिक सर्जरी करून तो भाग बोलण्यासाठी किंवा जेवण्यासाठी योग्य असा बनवला जातो.

Oral Cancer Symptoms
Learning Disorder Symptoms : शैक्षणिक अक्षमता ही एक मानसिक स्थिती आहे, यासाठी ठराविक उपचार नाहीत; कशी असतात लक्षणे?

कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे?

तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे. दारूचे सेवन बंद करणे, पोषक आहार घेणे, आहारामध्ये ताज्या भाया व फळे यांचा समावेश असणे, सात ते आठ तासांची नियमित झोप घेणे. त्याचबरोबर योग्यवेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेणे महत्वाचे.

(डॉ. स्वस्तिक हॉस्पिटल येथे कान, नाक, घसातज्ज्ञ आहेत.)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com