शरीरातील चरबी कमी करण्यासाठी करा तुळशीचा वापर; हे आहेत फायदे

Use basil to reduce body fat These are the benefits
Use basil to reduce body fat These are the benefits

नागपूर : तुळशीचे झाडं प्रत्येकाच्या घरी असते. त्याची आपण रोज पुजाही करत असतो. मात्र, या शाळाचे आर्श्चकारक फायदे आहे, हे अनेकांना माहिती नाही. तुळशीचे पान खाल्याने वजन कमी असे म्हटल तर तुमचा विश्वास बसणार नाही. यामुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. तुळशी आणि तुळशीची पाने बऱ्याच वर्षांपासून आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरले जात आहेत. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

तुळशीच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला बऱ्याच रोगांपासून वाचवू शकतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्यामुळे आपणास कोणत्याही विषाणूची लागण त्वरित होऊ शकत नाही. हेच कारण आहे की आज कोरोना साथीचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी तुळशीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जात आहे. एवढेच नाही तर तुळशीच्या पानांनी आपले वजनही कमी करता येते. 

हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. सर्दी, खोकला, घसा खवखवल्यावर तुळशीच्या पानांपासून तयार केलेला काढा पिल्याने चुटकीसरशी शारीरिक समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आणि त्यापासून बनविलेला चहा पिल्याने आपण दीर्घ आयुष्य निरोगी राहू शकता.

तुळशीपासून बनवलेल्या चहात अजिबात कॅलरी नसतात, म्हणून त्याचे सेवन केल्यास वजन वाढत नाही. जर आपण जिममध्ये जाऊन वजन कमी करत असाल, आपले शरीर तंदुरुस्त बनवीत असाल तर अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी जिममध्ये जाण्यापूर्वी तुळशीचा चहा प्यावा. यामुळे तग धरण्याची क्षमता वाढेल आणि अधिक मेहनत घेत तुम्ही त्वरित तुमची चरबी बर्न करण्यास सक्षम व्हाल.

पचन शक्ती सुधारते

पचन शक्ती चांगली राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुळशीचा चहा प्यावा. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. आतड्याची हालचाल चांगली होते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.

यकृत निरोगी राहते

तुळशीचा चहा पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर येते. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. यकृत पचन प्रक्रियेस मदत करतो आणि शरीरास आतून स्वच्छ करतो. यकृत शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतो आणि शरीरातील चरबी कमी करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज तुळशीची पाने किंवा त्यापासून बनवलेला चहा घ्यावा.

वजन होते कमी

जर आपणास वजन कमी करायचे असेल तर आपण सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने चावावी. चवीने थोडे कडवट असतात, पण कारल्यासारखे कडू नसतात. त्यामुळे तुम्ही ते सहज खाऊ शकता. तुळशीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात 5-7 तुळशीच्या पानांना टाकून उकळावे. हवे तर आपण यात तुळशीचे बीज, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस देखील घालू शकता. ते थंड किंवा हलके कोमट झाल्यास प्यावे.

चयापचय वाढवतात

तुळशीची पाने शरीरातील चयापचय वाढवतात. ही पाने खाल्ल्याने चयापचयामध्ये सुधारणा होते. यामुळे कॅलरी जलद बर्न होते. यामुळे अन्न ऊर्जेमध्ये बदलते. जेव्हा शरीराचे चयापचयाची क्रिया सुधारते तेव्हा वजन वेगाने कमी होते. यामुळे शरीरात जमलेली चरबी बर्न होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com