
माझे धारणा व ध्यान आणखी पुढे जाऊन मानसिक, भावनिक व आध्यात्मिक पातळीवर शरीराची स्वच्छता करते. योगाचा शेवटचा टप्पा आहे समाधी आणि तुम्ही एकदा तेथे पोचल्यावर तेथून पुढे केवळ ‘कैवल्या’चा अनुभव असतो..
एक लाइफ कोच असल्यामुळे माझ्यासमोर अत्यंत वेदनादायी कहाण्या व पार्श्वभूमी असलेले अनेक लोक येतात. मात्र, माझे योगिक आयुष्य मला तळपत्या सूर्याप्रमाणे शुद्ध ठेवते. हे आयुष्य मला त्यांच्या दुःखात बुडून जाण्याऐवजी त्यांना प्रकाश दाखवण्याची संधी देते. इतरांच्या दुःखांचे सोडून द्या, मलाही माझ्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, मात्र ते योगाच्या सरावामुळे ते माझे आयुष्य झाकोळून टाकू शकत नाहीत. योगामधील यम आणि नियमांमुळे मला माझ्या मुल्यांनुसार जगता येते आणि आयुष्य समृद्ध करणाऱ्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. आसने, प्राणायाम, प्रत्याहाराचा सराव माझ्या शरीर, मन व काही प्रमाणात आत्म्यातील विषारी पदार्थ बाहेर फकतो. माझे धारणा (कॉन्सनट्रेशन) व ध्यान (मेडिटेशन) आणखी पुढे जाऊन मानसिक, भावनिक व आध्यात्मिक पातळीवर शरीराची स्वच्छता करते. योगाचा शेवटचा टप्पा आहे समाधी आणि तुम्ही एकदा तेथे पोचल्यावर तेथून पुढे केवळ ‘कैवल्या’चा अनुभव असतो...
हेही वाचा : विपशन्येतून ध्यानधारणेचा अनुभव...
अभ्यास आणि वैराग्य
हे सर्वाचा अंगीकार करणे सोपे नाही, मात्र तुम्ही अमृताची चव घेतल्यानंतर तुम्ही आयुष्याच्या दर्जाशी तडजोड करीत ऐहिक जीवनातील चिखल आणि घाणीला आमंत्रण देणार नाही. मनुष्य प्राण्याला शारीरिक अंतःप्रेरणा आणि आध्यात्मिक आकांक्षा असतात. त्यामुळेच आपल्या दैवी जगण्याची उमेद व उत्साह टिकवण्यासाठी निंदक व अडथळा आणणाऱ्यांविरोधात तिप्पट दारूगोळा घेऊन लढावे लागते. मला गेल्याच महिन्यात केलेल्या २१ दिवसांच्या विपश्यना शिबिरात आयुष्यातील सर्व दुःखांचा सामना अभ्यास आणि वैराग्य या योगाच्या दोन स्तंभाच्या आधारे करता येतो, हे जाणवले. हा सततचा सराव आणि अलिप्तपणाची प्रक्रिया आहे. योगाच्या सरावातील ध्यानधारणा महत्त्वाची ठरते व अलिप्तपणाच्या सरावात कोणतेही ध्येय गाठायचे नसते, मोक्ष मिळवायचा नसतो, कोणतीही भौतिक सुखे मिळवायची नसतात...फक्त सराव करा आणि अलिप्त रहा. आयुष्यातील सर्व सुखे तुमच्या पायाशी लोळण घेतील...आयुष्याचा हाच विरोधाभास आहे, की तुम्ही कशाची अपेक्षा करीत नाही, तेव्हा ते तुम्हाला जगातील सर्वोत्तम देते...
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हाच तुमच्यासाठी योग आहे
योगिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्सही आहेत. तुमचे वय कमी दिसते (मी माझ्या वयाच्या निम्मी दिसते.), कायम आनंदी राहता येते, सूर्यासारखे तेज मिळते, सतत सकारात्मक विचार येतात, सुदृढ शरीर मिळते, नातेसंबंध सुधारतात, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शांतता व स्थिरचित्तता मिळते. तुमच्यासाठी हे दुसरे कोणीही करू शकणार नाही.
इशारा - कोणी तुमच्या आयुष्यातील गोंधळ दूर करून देतो, असे सांगितल्यास तेथून पळा...
योगिक आयुष्य तुम्हाला तुमचा गुरू बनवते, तुमच्या अंतरात्म्यातील गोष्टी उलगडून दाखवते. तुम्ही त्याच्या शोधात निघावे, या अपेक्षेसह...