esakal | योगा लाइफस्टाइल : महत्व कुंडलिनी योगाचे

बोलून बातमी शोधा

Yoga}

तुमच्या मणक्याच्या खालील साडेतीन वेटोळ्यांत मोठी ताकद सामावलेली असते. ज्याप्रमाणे ७ हा आकडा शुभ मानला जातो, त्याचप्रमाणे त्याच्या अर्धा असलेला ३.५ ही शुभ आहे. त्यामुळेच आपल्याकडे साडेतीन शक्तिपीठे असल्याचे मानले जाते, मुहूर्तही साडेतीन आहेत, हटकायाही साडेतीन आहेत आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील.

health-fitness-wellness
योगा लाइफस्टाइल : महत्व कुंडलिनी योगाचे
sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

तुमच्या मणक्याच्या खालील साडेतीन वेटोळ्यांत मोठी ताकद सामावलेली असते. ज्याप्रमाणे ७ हा आकडा शुभ मानला जातो, त्याचप्रमाणे त्याच्या अर्धा असलेला ३.५ ही शुभ आहे. त्यामुळेच आपल्याकडे साडेतीन शक्तिपीठे असल्याचे मानले जाते, मुहूर्तही साडेतीन आहेत, हटकायाही साडेतीन आहेत आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील.

आपली कुंडलिनी काही आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या सरावाने जागृत करता येते. यासाठी या सर्वांचा किंवा त्यातील एखाद्याचा वापर करता येतो. मात्र, आसनांचा अभ्यास करताना त्यातील तीव्रता, शुद्धता व शिस्त याला मोठे महत्त्व आहे. ही सुप्त शक्ती मंत्र आणि तंत्रानेही जागृत करता येते. कुंडलिनी या ही नवी व्याख्या असून, त्यात तुम्हाला विशिष्ट परिणाम देण्यासाठी काही आसने विशिष्ट क्रमाने केली जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती तुमच्या पाठीच्या मणक्याच्या तळापासून डोक्याच्या मुकुटापर्यंतच्या ७ चक्रांमधून जाते. ती वरच्या दिशेला जाताना मोठा आनंद देते. तुम्हाला शांतता, प्रसन्नता, शीतलता व परिपूर्णतेची अनुभूती मिळते. तुमची कुंडलिनी जागृत राहिल्यास तुमच्या विचारांत अधिक स्पष्टता, मोठे सामर्थ्य, भरपूर ऊर्जा, दिव्यदृष्टी आल्याचे तुम्हाला आयुष्यभरासाठी जाणवेल. मात्र हे वाटते तेवढे सोपे नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वीच्या काळी असलेल्या अभिजात योगासनांमध्ये ८ अंगे असलेल्या योगासनांचा समावेश होत असे. यामध्ये स्वनियंत्रणाच्या सर्व आयामांचा समावेश केला होता, ज्याच उद्देश केवळ कुंडलिनी जागृत करण्याचा नव्हता, तर ती कायमच जागृत ठेवण्याचा होता. जर तुमची कुंडलिनी जागृत झाली आणि ती पुन्हा निद्रिस्त झाल्यास त्याचा काय उपयोग...या सर्वामागची संकल्पना सर्व ११४ चक्र त्यांच्या सर्वाधिक वेगाने फिरवत ठेवणे, तुमचे लक्ष कायम केंद्रित ठेवणे आणि तुम्हाला एखाद्या वाद्याप्रमाणे फिट ठेवणे हाच होता.

Edited By - Prashant Patil