esakal | योगा लाईफस्टाईल : पाठीचा कणा ताठच हवा!
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

योगा लाईफस्टाईल : पाठीचा कणा ताठच हवा!

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

पाठीच्या कणा हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. बैठी जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे पाठदुखी, पाठीत बाक येणे आदी समस्या उद्भवतात. त्यातून सुटकेसाठी काही आसने अनिवार्य आहेत. अशाच आसनांची माहिती आज घेऊ...

यष्टीकासन

या आसनाच्या नावातच काठीचा उल्लेख आहे आणि आसनात शरीराची स्थिती एखाद्या काठीसारखी असते. होय, आपल्या ऋषींनी निसर्गातील प्रत्येक घटकांचा अभ्यास केला आणि त्याचा उपयोग आसनांमध्ये केला. हे खूपच आश्चर्यकारक नाही का? आणि पाठीवर झोपून आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग असलेला पाठीचा कणा काठीसारखा सरळ करण्याची कल्पनाही आश्चर्यकारक नाही का? आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या पाठीच्या कण्यावर अगदी कधीतरीच ताण देतो. त्यामुळेच आपण एक प्रजाती म्हणून बुटके होत चाललो आहोत. त्याबरोबर आपल्या पाठीवर बाकही येत असून, आपण दिवसभर असेच चुकीच्या स्थितीमध्ये बसत राहिल्यास काही काळानंतर उंटालाही प्रश्न पडेल की खरा उंट कोण! या परिस्थितीत हे अत्यंत सोपे व फायदेशीर आसन आपल्या मदतीला धावून येते. त्यासाठी तुम्ही तुमच्या हाताच्या बोटापासून तळव्यापर्यंतचे सर्व शरीर ताणायला हवे, शरीरातील सर्व पेशी ताणल्या जातील हे पाहायला हवे व श्वास पूर्णपणे आत घेऊन तो बाहेर सोडायला हवा. हे आसन नियमित केल्यास तुमची उंची नक्कीच वाढले.

आसनाचे फायदे

 • स्नायूंमधील उतींवर व त्याप्रमाणे सर्व अवयांवरही ताण पडतो.

 • अतिरिक्त मेदाचे प्रमाण कमी होते.

 • रक्ताचे शरीरातील वहन सुरळीत होते.

 • पोटाचे व ओटीपोटीचे स्नायू बळकट होतात.

 • छातीचे स्नायू मोकळे होऊन श्वसन सुधारते.

 • बसण्याची स्थिती सुधारते. त्यामुळे बसताना खांदे खाली पडत नाही व त्याप्रमाणे पाठीमध्ये बाकही येत नाही.

 • तुमच्या मज्जासंस्थेला आराम मिळतो व ती शांत होते.

 • थकवा दूर होतो.

वक्रहस्त भूजंगासन

आ सनांचा सराव नुकताच सुरू केलेले आणि पाठीचा खालील भाग कडक असणाऱ्यांनी वक्रहस्त भूजंगासनाचा सराव करावा. या आसनामुळे तुमच्या शरीराच्या वरील भागावर अतिरिक्त दाब पडून तुमचे हात आणि खांदे सुदृढ बनतात आणि त्याबरोबर तुमच्या पाठीच्या खालील बाजूसही मसाज होतो. पाठीचा कणा वाकवला जातो आणि हृदयाचे स्नायू मोकळे होतात. तुमच्या पैकी ज्यांना आपल्या पोटाचा घेर कमी करायचा आहे, अशांनी दररोज एक मिनिटासाठी हे आसन नक्की करावे. अर्थात, त्यासाठी पौष्टिक आणि स्वच्छ आहार घेणे हेही तेवढेच आवश्यक आहे. तुम्हाला खचल्यासारखे, निराश, गुदमरल्यासारखे किंवा दमल्यासारखे वाटत असल्यास तुमचे डोके कोब्राप्रमाणे वर घ्या आणि तुम्हाला तुमचा मूड सुधारल्याचे जाणवेल. प्रयत्न करून पाहा!

आसनाचे फायदे

 • पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते आणि त्याची ताकदही वाढते.

 • शरीरातील छाती, खांदे, फुफ्फुसे व पोटासारख्या अनेक अवयवांवर ताण पडतो.

 • खांद्याचे व हाताचे स्नायू ताणले जातात.

 • शरीरांतर्गत अवयवांना मसाज मिळतो.

 • फुफ्फुसे आणि हृदय मोकळे होते.

 • पोटातील स्नायू उत्तेजित होतात.

 • अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांना फायदा होता.

 • सायटिकाचा त्रास कमी होतो.

 • शरीरावरील ताण आणि थकवा दूर होतो.

 • स्पॉंडिलायसिसचा त्रास असणाऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त आसन आहे.