blood vessels get blocked
blood vessels get blockedsakal

हेल्थ वेल्थ : रक्तवाहिन्या कशा ब्लॉक होतात?

मानवी शरीर ही एक जटिल प्लंबिंग सिस्टीम आहे. ती अडथळा येत नाही, तोपर्यंत शरीरातील द्रव आणि ऑक्सिजन संपूर्ण शरीराला पोहोचवणे कधीही थांबवत नाही.
Summary

मानवी शरीर ही एक जटिल प्लंबिंग सिस्टीम आहे. ती अडथळा येत नाही, तोपर्यंत शरीरातील द्रव आणि ऑक्सिजन संपूर्ण शरीराला पोहोचवणे कधीही थांबवत नाही.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

मानवी शरीर ही एक जटिल प्लंबिंग सिस्टीम आहे. ती अडथळा येत नाही, तोपर्यंत शरीरातील द्रव आणि ऑक्सिजन संपूर्ण शरीराला पोहोचवणे कधीही थांबवत नाही. हे अभिसरण विस्कळित होण्याची शक्यता अनेक कारणांमुळे निर्माण होते. उदाहरणार्थ, आपण पावसाळ्यातील थंडीमुळे एक नाकपुडी बंद झाल्याची भावना सर्वांनीच अनुभवली असेल. हे त्रासदायक आहे, कारण ते सामान्य श्वासोच्छावासात अडथळा आणून आपल्या शरीरात ऑक्सिजनच्या सामान्य प्रवाहात अडथळा आणते आणि जेव्हा ऑक्सिजन शरीरात प्रवेश करतो तेव्हा हा ऑक्सिजन रक्तवाहिन्या त्यातील रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांमध्ये वाहून नेतात, ह्या रक्तवाहिन्या हृदयाला सर्व अवयवांशी जोडून ठेवतात. धमण्यांद्वारे हृदय ऑक्सिजन-समृद्ध आणि पोषक तत्त्वांनी भरलेले रक्त संपूर्ण शरीराला पुरवते, म्हणून, धमण्यांना कोणतीही हानी झाल्यास हृदयाच्या आणि मेंदूसारख्या इतर अवयवांच्या सामान्य कार्यास धोका निर्माण होतो.

अडथळा आणि हानी

धमणी ही लहान पाईपसारखी असून, ती आतून पोकळ असते. समजा, एक छोटासा पाइप दोन बोटांमध्ये धरून तो थोडा दाबला आहे. असे केल्याने तुम्ही त्या पाइपमधून जाणारा प्रवाह कमी कराल किंवा पूर्णपणे देखील बंद कराल. धमण्यांचेही असेच काहीसे घडते. धमणी कोणीही प्रत्यक्षात चिमटीत धरत नाही, परंतु धमणीची आतील बाजू फॅटी पदार्थ, कॅल्शिअम आणि इतर टाकाऊ पदार्थांनी भरली जाते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्त प्रवाह अवरोधित होतो. रक्तप्रवाहात अडथळा आल्यावर शरीराच्या काही भागांना आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळणे बंद होते आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थोड्या काळासाठीही होत नसल्यामुळे स्ट्रोकसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे मेंदूसाठी हानिकारक आहे.

सामान्य धमणी, जी ब्लॉक झालेली नसते, अशा धमण्या रक्तप्रवाहाचा दाब अधिक करून सामान्य राहतो, परंतु धमणी ब्लॉक आणि अरुंद होऊ लागल्यावर हृदयावर अधिक ताण येतो. कारण, आता हृदयाला एका अरुंद छिद्रातून रक्त पंप करणे गरजेचे होते ज्याने उच्च रक्तदाबासारखी परिस्थिती निर्माण होते. परिणामी धमण्यांना हा दबाव सहन करावा लागतो आणि त्यावरील ताण अधिक वाढतो, ज्यामुळे आतील भागात अधिक फॅटी पदार्थ जमा होऊ लागतात. हे एक दुष्टचक्र आहे.

अडथळा कशामुळे होतो?

हृदयाचे कार्य कधीच थांबत नाही, त्यामुळे इतर सर्व स्नायूंप्रमाणे त्याची देखील झीज होते. ज्याप्रमाणे आपली घरगुती उपकरणे दररोज काम केल्यामुळे काही प्रमाणात झिजतात, त्याचप्रमाणे आपल्या धमण्यादेखील वयानुसार आकुंचित आणि अरुंद होत जातात. रक्तवाहिन्या आकुंचन पावत राहतात आणि वयानुसार अडथळे निर्माण होतात, मग ते आपल्याला पसंत असो किंवा नसो आणि हे सगळं आपल्या लक्षात न येता हळू हळू घडतं. कोलेस्टेरॉल, शरीरात आढळणारी अतिरिक्त चरबी आणि आपण खाल्लेली चरबी ह्या प्रक्रियेला वेग देते. कोलेस्टेरॉलचा हृदयाच्या कार्याशी संबंध आहे हे आपण ऐकले आहे. पण ह्याने नेमकं काय होते? प्रथम, कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत : एचडीएल आणि एलडीएल. एलडीएल हे वाईट मानले जाते कारण त्यात रक्तवाहिन्यांच्या आतील भागात जमा होण्याची प्रवृत्ती असते आणि ते धमण्यांना अरुंद करते. तर एचडीएलमध्ये रक्तवाहिन्यांमधून एलडीएल बाहेर काढण्याची, अडथळे कमी करण्याची प्रवृत्ती असते.

काय करता येईल?

तुम्हाला कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करावे लागेल, ही एक चांगली सुरुवात आहे, परंतु तुम्ही तुमच्या आहारातील कोलेस्टेरॉल कमी केले तरीही तुमचे शरीर कोलेस्टेरॉल तयार करत राहते. आहारातील कोलेस्टेरॉल शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉलच्या केवळ २५ % पर्यंत आहे. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कोलेस्टेरॉलची फॅक्टरी आहे. ही अतिरिक्त चरबी, विशेषत: पोटाच्या आसपास असलेली कोलेस्टेरॉल तयार करते आणि ते तुमच्या रक्तप्रवाहात ढकलत राहते, रक्तातील कोलेस्टेरॉल एकूण कोलेस्टेरॉलच्या सुमारे ७५% आहे. म्हणून, आहारातील कोलेस्टेरॉल आणि शरीरातील कोलेस्टेरॉल या दोन्हींचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

आहारातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा : तुमच्या आहारातून एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ कमी करा (फास्ट फूड, तूप, लोणी, खोबरेल तेल, अधिक काळासाठी गोठलेले पदार्थ.) तुमच्या आहारातून जास्त प्रक्रिया केलेले आणि फॅट असलेले अन्नपदार्थ कमी करा (चिप्स, बिस्किटे, केक, तळलेले पदार्थ.)

कोलेस्टेरॉल नियंत्रित करा

  • नियमितपणे व्यायाम करणे : पोटाची चरबी कमी करण्यासाठी दिवसातून ५ ते ६ वेळा ३० मिनिटे फिरायला जा किंवा धावा.

  • आपण चरबी आणि कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करणे थांबवू शकता, परंतु शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपले शरीर जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल तयार करू शकणार नाही.

  • तुम्ही वर नमूद केलेल्या तीन गोष्टींचे पालन करता, तेव्हा कोलेस्टेरॉलचे सेवन आणि उत्पादन दोन्ही कमी करता. तुम्ही त्या दिवसाची वाट पाहू नका जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुमच्या धमण्या ब्लॉक झाल्या आहेत. तुम्हाला त्या आधीसारख्या कार्य करण्यासाठी आणि होणारी हानी टाळण्यासाठी योग्य आहार घेणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com