हेल्थ वेल्थ : व्यायाम करूनही पोट पुढेच!

पोटाची चरबी कमी होणे ही बहुतेक लोकांसाठी वाढती चिंता आहे. तुम्ही पाहिले असेल, की व्यायाम करणाऱ्या लोकांचेही पोट दिसते.
Stomach Fat
Stomach FatSakal
Updated on
Summary

पोटाची चरबी कमी होणे ही बहुतेक लोकांसाठी वाढती चिंता आहे. तुम्ही पाहिले असेल, की व्यायाम करणाऱ्या लोकांचेही पोट दिसते.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

पोटाची चरबी कमी होणे ही बहुतेक लोकांसाठी वाढती चिंता आहे. तुम्ही पाहिले असेल, की व्यायाम करणाऱ्या लोकांचेही पोट दिसते. वय, आनुवंशिकता, व्यायाम आणि आहार यांसारखी पोटाभोवती चरबी जमा होण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही व्यायाम करून ही पोटाची चरबी का वाढत राहते आणि ती चरबी कमी होण्यास वेळ का लागतो, याची शास्त्रीय कारणे आज आपण पाहूया.

पोटाची चरबी सहज का जात नाही?

ज्या कारणाने तुमच्या संपूर्ण शरीरावर चरबी जमा होते, तेच तुमच्या पोटाभोवती चरबी साठण्याचे कारण आहे. तुम्ही अन्नातून खाल्लेल्या कॅलरीज तुमच्या शरीराचे नियमित कार्य करण्यासाठी व शारीरिक क्रिया पूर्ण करण्यापर्यंत लागणाऱ्या ऊर्जेसाठी वापरली जाते. जास्त कॅलरीज शिल्लक असल्यास तुमचे शरीर ते तुमच्या चरबी पेशींमध्ये फॅटच्या रूपात साठवते.

आपण जितक्या कॅलरी अन्नातून घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करत नाही तोपर्यंत आपण आपल्या शरीराच्या कोणत्याही भागातील चरबी पेशींमधून फॅट बाहेर काढू शकत नाही. शिवाय, आपल्या पोटावरील चरबी कमी करणे कठीण आहे कारण त्यात चरबी पेशींचे प्रमाण जास्त असते जे चरबीच्या विघटन प्रक्रियेस फार संथ प्रतिसाद देतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होते, तेव्हा इतर भागांच्या तुलनेत पोटाच्या भागातून वजन कमी होण्यासाठी जास्त वेळ लागतो.

आपल्या शरीरातील बहुतेक चरबी आपल्या त्वचेखाली साठवली जाते, तर दुसऱ्या स्वरूपातील फॅट ज्याला व्हिसरल फॅट म्हणतात ते पोटाच्या आत खोलवर साठवले जातात. उदा. यकृत, मूत्रपिंड इत्यादी. दोन्ही प्रकारचे फॅट आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असले, तरी जास्त प्रमाणात व्हिसरल फॅट हे कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत असते. याचे कारण, अतिरिक्त चरबी तुमच्या रक्तामध्ये फॅटी ॲसिड सोडते. ज्यामुळे तुमच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि शेवटी हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण होतात.

पोटाची चरबी कशी कमी करावी?

चरबी कमी करण्यासाठी, आपल्याला ऊर्जा स्रोत म्हणून चरबी वापरण्याची आवश्यकता आहे. तथापि, आपल्या शरीराचा ऊर्जेचा पसंतीचा स्रोत म्हणजे कार्बोहायड्रेट्स, जे आपल्याला आपल्या अन्नातून मिळतात. आपल्या शरीरात पुरेसे कर्बोदक नसल्यास, चरबीचा ऊर्जा स्रोत म्हणून वापर होईल. म्हणूनच, कॅलरीची कमतरता चरबी कमी होण्याची गुरुकिल्ली आहे. पोटाची चरबी कमी होणे केवळ तुमच्या शारीरिक स्वरूपासाठीच चांगले नाही, तर विविध आरोग्यविषयक आजारांपासून तुमचे रक्षण करू शकते. पोटाची चरबी कमी करण्यासाठीचरबी वापरणे महत्त्वाचे आहे. तुमचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही जास्त हालचाल करणे आणि खाणे नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

चरबी कमी करण्याच्या टिप्स

योग्य खा : तुमच्या कॅलरीजचे प्रमाण १०-२५% कमी करा. तुमच्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा कमी खाण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्ही दररोज १०० ग्रॅम तांदूळ खात असल्यास ते ८० ग्रॅमपर्यंत कमी करा. आहारात अधिक फायबर आणि प्रथिनांचा समावेश करा. चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्ससारखे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.

दिवसभर सक्रिय राहा : नियमित आणि सातत्यपूर्ण व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. शरीराला आव्हान देण्यासाठी एरोबिक आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा व्यायमात समावेश करा. त्याचबरोबर दिवसभर फिरणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

व्यायामाच्या ३-४ तास आधी खाणे टाळा : यामुळे तुमचा ग्लायकोजेन रिझर्व्ह कमी होईल आणि नंतर तुमचे शरीर तुमच्या व्यायामाला चालना देण्यासाठी ऊर्जा म्हणून चरबीचा वापर करेल.

एरोबिक्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग : एरोबिक व्यायाम, जसे की चालणे, धावणे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणे किंवा बॉडीवेट यांसारख्या व्यायामामुळे चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल.

प्रथिनांचे सेवन करा : सरासरी, तुम्ही तुमच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलो किमान १ ग्रॅम प्रथिनांचे सेवन केले पाहिजे. तुमचे वजन ६० किलो असल्यास तुम्ही दिवसभरात किमान ६० ग्रॅम प्रथिनांचे सेवन अपेक्षित आहे. व्यायाम करताना चरबीचे स्नायूंमध्ये जलद गतीने रूपांतर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com