
नवी दिल्ली : शरीर आतून पूर्णपणे मजबूत राहण्यासाठी, शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी शरीराला विटामिन्स योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. मात्र, जर आपण आपल्या आहारात विटामिन्सने भरपूर अशा गोष्टी समाविष्ट केल्या नाहीत तर आपल्या शरीरात विटामिन्सची कमतरता भासू लागते. आणि विटामिन्सची अशी कमतरता शरीरात भासणं धोकायदायक ठरू शकतं. अनेक आजारांना निमंत्रण देणारी ही गोष्ट ठरू शकते. आपला आहार वेगवेगळ्या विटामिन्सने युक्त असलेला असावा, याची पुरेपुर काळजी आपण घेतली पाहिजे. असं केल्याने आपण अनेक रोगांपासून लांब राहतो. वेगवेगळ्या विटामिन्सच्या कमतरतेने वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि त्यांची लक्षणे दिसून येतात.
विटामिन बी 7 ला बायोटिन या नावाने देखील ओळखलं जातं. हे विटामिन शरीराला उर्जा प्रदान करण्याचं काम करतं. जर या विटामिनची कमतरता शरीराला जाणवली तर नखे आणि केस कमकुवत झाल्याने तुटू लागतात. सामान्यत: विटामिन बी आणि आयरनच्या कमतरतेमुळे तोंडाचा अल्सर होतो. त्यासोबतच ओठ आणि ओठाचे किनारे देखील फुटतात. तिथून रक्तस्त्राव देखील होऊ लागतो. हे सगळं विटामिन बी 2 आणि आयरनच्या कमतरतेमुळे घडतं.
दातांतून रक्त येणं
विटामिन सीच्या कमतरतेमुळे दातातून रक्त येणं, शरीरातील मांसपेशी कमकुवत होणं तसेच थकवा येणं, अशा गोष्टी घडतात. याचं मुख्य कारण असं आहे की, शरीरात विटामिन सी स्वत:हून तयार होत नाही तर आपल्याला आपल्या आहारात त्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश करावा लागतो. केसगळती या समस्येचं मुख्य कारण विटामिन्सची कमतरता हेच असतं. आजकाल खाण्यापिण्याकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वयाच्या 30 व्या वर्षीच केसगळतीची समस्या भेडसाऊ लागते.
रेस्टलेस लेग सिंड्रोम
रेस्टलेस लेग सिंड्रोममुळे पायांमध्ये वेगळ्याच प्रकारची अस्वस्थता जाणवू लागते. तसेच पाय हलवण्यामध्ये अडचण निर्माण होते. या समस्येचा थेट संबंध आयरनच्या कमतरतेशी निगडीत आहे. ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठीच चौरस आहार घेणं आवश्यक आहे. त्वचा लाल होणे तसेच त्वचेवर रॅशेस येणं यामागे देखील विटामिन बी 6 ची कमतरता हेच कारण आहे. कारण विटामिन सिंथेसिज कॉलेजनमध्ये मदत करतो, जो चांगल्या आरोग्यदायी त्वचेसाठी आवश्यक असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.