esakal | ब्लड शूगर कंट्रोल करायचंय? चेरीसह 7 पदार्थांचे करा सेवन
sakal

बोलून बातमी शोधा

blood sugar.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लघवीला वारंवार जावं लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे. पुढील काही पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

ब्लड शूगर कंट्रोल करायचंय? चेरीसह 7 पदार्थांचे करा सेवन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मधुमेह (इंग्रजी : डायबेटिस मेलिटस)  या आजारात रक्तातील साखरेचे (ब्लड शूगर) प्रमाण असंतुलित होते. आपण जे अन्न खात असतो, त्याचे शरीराला आवश्यक उर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होत असते. पण, काहीवेळा शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करु शकत नाही. यावेळी पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लघवीला वारंवार जावं लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे. पुढील काही पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

सफरचंद

सफरचंदमध्ये असलेल्या हाय फायबरमुळे ब्लड शूगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

ओटमील

ब्लड शूगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी ओटमीलही फायदेशीर ठरू शकते. 

अवोकाडो 

अवोकाडोमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड आढळते. ब्लड शूगर रोखण्यासाठी याची मदत होते. 

मोसंबी

मोसंबीचा रस पिल्याने त्यात असणारे विटॅमिन-सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट ब्लड शूगरची मात्रा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 

ब्राऊन राईस

शरीरातील ब्लड शुगरची मात्रा लेवलमध्ये ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला दिला जातो.

सेलिब्रिटी फिटनेस  : ध्यान व योगातून सुदृढता! 

कीवी

ब्लड शूगर नियंत्रणात ठेवण्यासाठी डायबेटीजच्या रुग्णांनीही कीवीचे सेवन केले पाहिजे. 

केल 

केल पौष्टिक गुणांनी युक्त असते. याच्या सेवनामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. 

खुबानी

खुबानीमध्ये कॉपर आणि पोटॅशियम असते. याच्या सेवनामुळे ब्लड शूगरचे संतुलन राखण्यास मदत होते. 

चेरी

चेरीमध्ये पॉलिफेनॉल आणि व्हिटामीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. याच्या सेवनामुळे ब्लड शूगरची लेवल नियंत्रणात येण्यास मदत होते. 

पालक

पालकच्या सेवनामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर पालक ब्लड शूगर नियंत्रणात ठेवण्यातही महत्वाची भूमिका बजावते.