वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज बर्न करायच्यात? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज बर्न करायच्यात? जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज बर्न करायच्यात? जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज बर्न करायच्यात? जाणून घ्या

वजन वाढलं की ते तुमच्या चेहरा, कपड्यावर दिसू लागतं. तसेच अनेकजण डाएट फॉलो करतात.कमी जेवतात. पण वजन लवकर कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं हे कारणीभूत ठरत नाहीत. त्यामुळे तुमचे कमी झालेले वजन पुन्हा वाढू शकते. वजन कमी करण्याचा आणि ते मेंटेन ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ते हळूहळू कमी करणे.म्हणून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणखी बदल करावे लागतील.

weight loss

weight loss

एका आठवड्यात किती वजन कमी कराल? - NHS (UK) च्या अभ्यासानुसार, एका आठवड्यात 0.5 ते 1 किलो वजन कमी करणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. यापेक्षा जास्त वजन एकदम कमी झाल्यास पित्ताशयाचे खडे, थकवा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. वजन लवकर कमी करण्यासाठी,तुमचा संतुलित आहार आणि व्यायामाचे पथ्य पाळावे लागेल. हे प्रयत्न कायमस्वरूपी करावे लागतील.

Weight Loss

Weight Loss

वजन कमी करण्याचे गणित- 0.45 किलो फॅटमध्ये 3500 कॅलरीज असतात. म्हणून, आठवड्यात अर्धा किलो वजन कमी करायचे असेल तर, तुम्हाला दररोज 500 जास्त कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. 500X7 = 3500 कॅलरीज, ज्यामुळे अर्धा किलो वजन कमी होईल.

जलद वजन कमी झाल्याने टिश्यूंवर परिणाम होतो- जेव्हा तुमचे वजन खूप लवकर कमी होते, तेव्हा तुमची चरबी कमी होत नाही, परंतु पाण्याचे वजन आणि लीन टिश्यूवर परीणाम होतो. म्हणून तुमच्या रोजच्या आहारातून तुम्ही ५०० कॅलरी कमी करणे आणि तुमची शारीरिक हालचाल वाढवणे फायदेशीर ठरते.

weight loss

weight loss

निरोगी राहा- सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, तुमच्या शरीराच्या एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्के वजन कमी केल्याने रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारेल. हा फायदा शरीराला होईल. जर तुम्ही शरीराला चांगल्या सवयी लावल्यात तर त्याचे योग्य परिणाम दिसतील.निरोगी राहा

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, तुमच्या शरीराच्या एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्के वजन कमी केल्याने रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारेल. हा फायदा शरीराला होईल. जर तुम्ही शरीराला चांगल्या सवयी लावल्यात तर त्याचे योग्य परिणाम दिसतील.

loading image
go to top