Weight Loss Tricks: घरगुती उपायांद्वारे आटोक्यात आणता येईल वजन

रोजच्या आहारात योग्य फळांचा, पालेभाज्यांचा आणि पेयांचा समावेश केला पाहिजे. वजनावर नियंत्रण करण्यासाठी खानपान असेल किंवा दिवसाचे नियोजन, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे
weight loss
weight lossweight loss
Summary

रोजच्या आहारात योग्य फळांचा, पालेभाज्यांचा आणि पेयांचा समावेश केला पाहिजे. वजनावर नियंत्रण करण्यासाठी खानपान असेल किंवा दिवसाचे नियोजन, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे

औरंगाबाद: सध्या वजन कमी करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात पण यामध्ये त्यांना अपयश येत असतं. वजन कमी करण्याच्या नादात आहार कमी करून त्याचा तोटा स्वतःच्या आरोग्यावर करून घेत असतात. वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी रुटीन असणं गरजेचं असतं. खासकरून तुम्ही जर सकाळच्या रुटीनमध्ये योग्य तो बदल केला तर त्याचा मोठा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. सध्याच्या धावत्या जगात वजन कमी करण्यासाठी विविध ट्रीक्स वापरल्या (Tricks For Weight Loss) पाहिजेत.

रोजच्या आहारात योग्य फळांचा, पालेभाज्यांचा आणि पेयांचा समावेश केला पाहिजे. वजनावर नियंत्रण करण्यासाठी खानपान असेल किंवा दिवसाचे नियोजन, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. बरेच लोक एकदम टोकाचा डाइट प्लॅन (Diet Plan) आणि कठोर व्यायाम करतात. पण याचा उपयोग बऱ्याचदा होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा समावेश तुमच्या दैनंदिन जिवनात करू शकता.

1) गाजर

थंडीच्या दिवसांत गाजर खाल्यास ते आरोग्यदायी ठरते. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्यांसोबत फळेही बाजारात सहज उपलब्ध असतात. याकाळात गाजरही बाजारात उपलब्ध असते. तुम्ही आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरांपासून बनवलेला ज्यूस तसेच गाजरांचा हलवाही तुम्ही खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो.

गाजरांचा आहारात समावेश केल्यास त्याचा मोठा फायदा होतो
गाजरांचा आहारात समावेश केल्यास त्याचा मोठा फायदा होतो

2) सकाळचा व्यायाम-

आरोग्यदायी आणि तंदूरुस्त राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी सकाळी योग्य व्यायाम करणे गरजेचं असतं.

weight loss
Corona Update: नांदेडकरांनी जिंकलं! जिल्ह्यात केवळ दोन रुग्णांची वाढ

4) दालचिनी :

दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

weight loss
Weight Loss Diet मध्ये करा या फळांचा समावेश

3) मेथी :

मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

(Desclaimer: ही माहिती सर्वसाधारण आहे. तुम्ही याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com