सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे!

स्नेहा गांवकर
Thursday, 12 December 2019

स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते. 

स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री 
स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.

दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.

मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What and when to eat is important for fitness