Aerial Yoga: एरियल योगा म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

एरियल योग हे पारंपारिक योगाचं नवं रुप आहे.
Benefits of Aerial Yoga
Benefits of Aerial YogaSakal

Benefits of Aerial Yoga: योग हे तणाव दूर करण्याचे आणि शरीराला निरोगी करण्याचे जुने तंत्र आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. अनेक जुनाट आजारांचा धोका देखील त्यामुळे कमी होऊ शकतात. एरियल योग हे पारंपारिक योगाचं नवं रुप आहे. हा योग शरीराला आधार देण्यासाठी झोपाळ्याच्या मदतीने केला जातो. एरियल योगामध्ये, हॅमॉक (झोपाळा) छतावरून लटकत असतो आणि तुम्हाला तुमच्या पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर आणि मणक्यावर कोणताही दबाव न आणता स्विंगच्या मदतीने वेगवेगळी आसने करावी लागतात. आज जाणून घेऊया एरियल योगाबद्दल खास माहिती...

Benefits of Aerial Yoga
योग- जीवन : जानुशीर्षासन

एरियल योग किंवा हवाई योगाचे आरोग्यासाठी फायदे:

1. जेव्हा तुम्ही स्विंगवर एरिअल योगा आणि हवाई योगा करत असता, तेव्हा मणक्याचे स्नायू शिथिल होतात आणि सांध्यावर दाब आणि कॉम्प्रेशन कमी होते.

2. एकाग्रता आणि एकाग्रतेची पातळी वाढवण्यासाठी पारंपारिक योग नेहमीच चांगला असतो. जेव्हा तुम्ही पोझसाठी स्विंग वापरता तेव्हा हे अधिक प्रभावी होते.

3. एरियल योगामुळे पाठीचा वरचा भाग मजबूत होतो कारण पोट, खांदे आणि हात एकमेकांशी कनेक्टेड असतात. खांदा, मान आणि पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा योग अत्यंत फायदेशीर आहे. हे स्नायूंना आराम देते आणि रक्त प्रवाह वाढवते.

4. स्विंगमुळे तुम्ही एरियल योगामध्ये आराम करू शकता. हे तुमची मुद्रा, लवचिकता आणि अलाईनमेंट उत्तम राखते.

Benefits of Aerial Yoga
मेंदू तल्लख ठेवायचायं? मग करा हे सोपी व्यायाम

एरियल योगा करण्यासाठी तुम्ही काय परिधान करावे?

हा योग करण्यासाठी, तुम्ही आरामदायक काहीतरी परिधान केले पाहिजे परंतु जास्त सैल कपडे घालू नये कारण ते झोपाळ्यामध्ये अडकू शकते. लांब-बाही टॉप आणि लेगिंग्स घालणं योग्य राहील.

एरियल योगा कोणी करावा?

एरियल योग मजेदार तर आहेच, पण एक उत्तम व्यायामही आहे. जर तुम्ही जिमला जात नसल्यास हा व्यायाम तुमच्यासाठी नक्कीच आहे. परंतु प्रोफेशनल ट्रेनरकडून प्रशिक्षण घेतल्याशिवाय एरियल व्यायाम करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com