esakal | बोन डेथ: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये नवीन आजार?
sakal

बोलून बातमी शोधा

pain

बोन डेथ: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये नवीन आजार?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेले अनेक जण सध्या पोस्ट कोविडच्या लक्षणांनी त्रस्त आहेत. आतापर्यंत अनेक जणांना म्युकोरमायकोसिस (ब्लॅक फंगस) झाला आहे. यामध्येच भर म्हणून आता बोन डेथ म्हणजेच अवस्क्युलार नेक्रोसिस (AVN) या नवीन आजाराने डोकं वर काढलं आहे. अलिकडेच मुंबईमध्ये बोन डेथचे काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. म्हणूनच, बोन डेथ म्हणजे काय, त्याची लक्षणे व कारणे कोणती आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (what-is-bone-death-after-covid-recovery)

बोन डेथ (AVN) म्हणजे काय ?

AVN या आजारात हाडांना होणार रक्तपुरवठा खंडीत होतो. परिणामी, त्या ठिकाणच्या पेशी मृत होतात. अनेकदा हाडांना तडे जाऊन हाडे तुटतातदेखील. हाडांना तडे गेल्यामुळे हाडे तुटणे किंवा सांधा विरघळणे ही प्रक्रिया सुरु होते. साधारणपणे ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्ये हा आजार होत असल्याचं पाहायला मिळतं.

हेही वाचा: खरा की खोटा? ओरिजनल मोती कसा ओळखाल?

बोन डेथची कारणे -

कोरोनाचे गंभीर संक्रमण झालेल्या रुग्णांमध्ये स्टेरॉइड दिलं जातं. अशा रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. सोबतच इतर अवयव आणि हाडांनादेखील धोका पोहोचण्याची शक्यता असते. कोरोना उपचारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कोर्टीकॉ स्टेरॉईडमुळे कोर्टीसोल या हार्मोनचे प्रमाण वाढते. परिणामी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि बोन टिश्शूची निर्मिती होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सांधे विरघळण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यावर पाच-सहा महिन्यात त्याचे परिणाम दिसू लागतात.

बोन डेथची लक्षणे -

१. AVN पहिल्या दोन ग्रेडमध्ये असेल तर निदान होणार वेळ लागतो.

२. सुरुवातीला सांध्यांमध्ये वेदना होतात.

३. रुग्णाला चालायला त्रास होतो

बोन डेथवर उपचार -

बोन डेथचं निदान लवकर झालं तर औषधोपचाराने हा आजार बरा होतो. तीन ते सहा आठवड्यातच औषधांचा परिणाम दिसू लागतो. प्राथमिक अवस्थेमध्ये प्लेटलेट रिच प्लाजमा (PRP) याचा वापर केला जातो. पण आजार वाढला किंवा त्याची तीव्रता वाढली तर त्यामुळे खुब्याचा सांधा विरघळतो. आणि, कृत्रिम सांधेरोपण हा एकच पर्याय उपलब्ध राहतो. जर कोणाला कोरोना मुक्तीनंतर पार्श्वभाग किंवा मांड्यांजवळ वेदना होत असतील, मांडी घालताना त्रास होणे, जिना चढता-उतरताना त्रास होत असेल तर अथवा जांघेत दुखत असेल, मांडी घालण्यास त्रास होत असेल त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने एमआयआर करावा.

(लेखक डॉ. विश्वजीत चव्हाण हे पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत.)

loading image