कार्यक्षमता म्हणजे काय?

कार्यक्षम कसे व्हावे?
कार्यक्षमता म्हणजे काय?

वयाचा कोणताही टप्पा गाठला तरीदेखील माणसाचे श्रम काही थांबत नसतात. प्रत्येक वयात आपण काही ठराविक आखून दिलेली काम करत असतो. विद्यार्थी असताना अभ्यास, नोकरी करताना आर्थिक जोडणी तर गृहिणी असताना कुटुंबाचा सांभाळ. यात प्रत्येकाच्या कामाचं स्वरुप जरी वेगळं असलं तरीदेखील श्रम आणि मेहनत कमी-अधिक प्रमाणात सारखीच लागत असते. त्यामुळेच अनेकदा थकवा, अशक्तपणा जाणवतो. याच समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आपली कार्यक्षमता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, ही कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय किंवा ती कशी वाढवावी ते जाणून घेऊयात. (What-is-efficiency-and-How-to-be-Efficient-health-yoga-benefits)

मुळात कार्यक्षमता म्हणजे काय?

किती तास काम करतो, दिवसात किती वेळ बिझी असतो, किती मल्टिटास्किंग करतो हे कार्यक्षमतेचे निकष नाहीत. ऑफिसमध्ये आठ ते नऊ तास काम करून किती आउटपुट दिले आहे, हे पाहिल्यास अनेकदा समजते की, आपण नुसतेच आणि उगाचच बिझी असतो. आज कॉर्पोरेट कंपन्यांच्या समस्या याच आहेत की, आठ ते नऊ तास लोक उपस्थित राहूनही कार्यक्षमता खूपच कमी आहे. वेळेचे नियोजन (time management) आणि नि:संदिग्धता (clarity) यांनी कामात गुणात्मक वृद्धी होते, फक्त क्वांटिटेटिव्ह नाही. काळ हा सापेक्ष असल्याने वेळेवर कार्यक्षमता अवलंबून असू शकत नाही, निष्पन्न काय होते ते महत्त्वाचे. आपण आठ तासांत जे काम करतो ते चार तासांत होऊ शकले, तर उगाचच उरलेला वेळ भरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे कार्यक्षमता ही प्रत्येकाने स्वतः ठरविण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाची परिमाणे एक असू शकणार नाहीत.

कार्यक्षमता म्हणजे काय?
'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' कोणासाठी व का?

कार्यक्षम कसे व्हावे?

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना वाटते कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अजून कशी वाढेल, शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी हेच वाटते. आपल्या सर्वांकडे तेच चोवीस तास, एक शरीर आणि मेंदू हे सर्व असले, तरी त्याचा वापर करून क्षमता कशा उंचावायच्या हे त्या त्या व्यक्तीच्या हातात आहे. त्याचसोबत उद्देश, एकतत्त्व अभ्यास, एकाग्रता आणि आरोग्य या चार महत्त्वाच्या पैलूद्वारे आपण आपली कार्यक्षमता वाढवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com