देशावर आता ग्रीन फंगसचं सावट; 'ही' आहेत लक्षणे, कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

green fungus

देशावर आता ग्रीन फंगसचं सावट; 'ही' आहेत लक्षणे, कारणे

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत अनेकांमध्ये पोस्ट कोविडची लक्षण आढळून आली आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेले असंख्य जण सध्या ब्लॅक, यल्लो आणि व्हाईट या गंभीर समस्यांचा सामना करत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे हे नवीन आजार यांचं सत्र सुरु असतानाच आता ग्रीन फंगस (green fungus) या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर या रुग्णामध्ये ग्रीन फंगसची लक्षण आढळून आली. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच आता ग्रीन फंगस म्हणजे काय, त्याची लक्षण कोणती व उपाय कोणते याचा शोध नागरिक घेऊ लागले आहेत. म्हणूनच, या विषाणूबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (what-is-green-fungus-know-about-symptoms-and-prevention-fungus-infection-and-covid19)

ग्रीन फंगस म्हणजे नेमकं काय?

ग्रीन फंगसला एस्परगिलोसिस इंफेक्शन असंही म्हटलं जात आहे. हे एक दुर्मिळ इंफेक्शन असून सर्वसामान्यपणे जाणवत असलेल्या फंगसचाच एक भाग आहे. त्यालाच वैद्यकीय भाषेत एस्परगिलस असं म्हटलं जातं. या विषाणूची लागण घरात किंवा घराबाहेरही होऊ शकते. हा विषाणूदेखील श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करत असतो. सध्या कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये ग्रीन फंगस आढळून येत आहे. वजन कमी असणे किंवा अशक्तपणा यामुळेदेखील याची लागण होऊ शकते.

हेही वाचा: Yellow Fungus: काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर आणखी एक आजार

"कॅंडिडा, एस्परगिलोसिस, क्रिप्टोकोकस, हिस्टोप्लास्मोसिस आणि कोक्सीडियोडोमायकोसिस असे फंगसचे अनेक प्रकार असतात. त्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकोरमायकोसिस, कॅडिडा आणि एस्परगिलोसिस या फंगसची लागण लवकर होऊ शकते", असं एम्स रुग्णालयातील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

ग्रीन फंगस का होतो?

श्वसनाद्वारे ग्रीन फंगसचे विषाणू शरीरात प्रवेश करत असतात. साधारणपणे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा विषाणू सहज प्रवेश करतो. या विषाणूची लागण झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती, फुफ्फुस यांच्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे या विषाणूचं संक्रमण एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्यांना होत नाही.

हेही वाचा: Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

ग्रीन फंगसची लक्षणे कोणती?

ताप येणे,छातीत दुखणे, खोकला, खोकतांना रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून रक्त येणे, वजन कमी होणे, अशक्तपणा.

ग्रीन फंगसला नियंणात कसं आणायचं?

१. कोणत्याही विषाणूचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शारीरिक स्वच्छता प्रथम बाळगा.

२. धूळ, प्रदुषण, दुषित पाणी अशा ठिकाणी जाणं टाळा.

३. मास्क सतत वापरा.

४. हात आणि चेहरा कायम स्वच्छ पाण्याने धुवा.

loading image
go to top