esakal | #PCOD : केस गळतात? जाणून घ्या पीसीओडीच्या लक्षणांविषयी

बोलून बातमी शोधा

#PCOD : केस गळतात? जाणून घ्या पीसीओडीच्या लक्षणांविषयी

स्त्रिया अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

#PCOD : केस गळतात? जाणून घ्या पीसीओडीच्या लक्षणांविषयी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात १०० पैकी ६० टक्के महिलांमध्ये आढळून येणारी समस्या म्हणजे पीसीओडी. बदलती जीवनशैली आणि खाद्यपद्धती यांचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. यामध्येच अनेक महिला पीसीओडी किंवा पीसीओएस या सारख्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. खरं तर अनेकदा स्त्रिया त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात किरकोळ वाटणारे आजार नंतर गंभीर स्वरुप धारण करु शकतात. त्यामुळे खासकरुन महिलांनी त्यांच्या शरीरात होणाऱ्या प्रत्येक बदलाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. यामध्येच आता पीसीओडीची नेमकी लक्षणं कोणती ते पाहुयात.

पीसीओडीची समस्या जाणवायला लागल्यावर अनेकदा स्त्रियांचं किंवा तरुणींचं वजन वेगाने वाढायला लागतं. त्यामुळे अनेकदा वाढलेल्या वजनामुळे अनेकींमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. मात्र, अशा वेळी नैराश्यात न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही फायद्याचं ठरेल.

पीसीओडीची लक्षणे -

१ अनियमित मासिक पाळी
२. गर्भधारणा होण्यास अडचण
३. वंधत्व
४. चेहऱ्यावर मुरूम येणे
५. केस गळणे
६. अशक्तपणा 

हेही वाचा : #PCOD : जाणून घ्या, पीसीओडी म्हणजे नेमकं काय?

दरम्यान,लठ्ठपणामुळे मासिकपाळी अनियमित होत असल्याने अनेकदा महिलांना वंधत्वाचा सामना करावा लागतो. वंधत्वाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. याशिवाय योगासने करावे आणि रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुग्धजन्य पदार्थ, जंकफूड, कोल्ड ड्रिंक आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावेत. 

(लेखिका डॉ. अपर्णा गोविल भास्कर या मुंबईतील अपोलो रुग्णालयात बॅरिअँटिक अँण्ड लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)