esakal | #PCOS : चेहऱ्यावर पुरळ येतंय?  जाणून घ्या पीसीओएसची लक्षणं

बोलून बातमी शोधा

#PCOS : चेहऱ्यावर पुरळ येतंय?  जाणून घ्या पीसीओएसची लक्षणं

'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका

#PCOS : चेहऱ्यावर पुरळ येतंय?  जाणून घ्या पीसीओएसची लक्षणं

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात तरुणींमध्ये 'पीसीओएस' ही एक समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पीसीओएस ही एक अनुवांशिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात. अनेकदा ही समस्या निर्माण होण्यापूर्वी त्याची काही लक्षण स्त्रियांना जाणवत असतात. मात्र, हीच खरी पीसीओएसची लक्षणं आहेत हे फारसं लक्षात येत नाही. त्यामुळे किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर ही समस्या त्रासदायक ठरते. त्यामुळे पीसीओएसची नेमकी लक्षणं कोणती ते पाहुयात.

PCOS म्हणजे नेमकं काय?

स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोष (ओव्हरी) असतात जे गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला बीजांडकोष हे एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण करते व त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन व एँन्ड्रोजेन या हार्मोनल अंतःस्त्रावांची निर्मितीसुद्धा करते. परंतु, पीसीओएसमध्ये महिलेच्या बीजांडकोषात स्त्रीबीज तयार होते. परंतु, हे बीज फुटत नसल्याने मासिक पाळी येत नाही. अशा स्थितीत ओव्हरीमध्ये छोट्या-छोट्या सिस्ट(गाठी) तयार होतात. अशावेळी महिलेला गर्भधारण करण्यास अडचणी येतात. काही महिलांमध्ये वंधत्वाची समस्याही निर्माण होते.

हेही वाचा : #PCOD : केस गळतात? जाणून घ्या पीसीओडीच्या लक्षणांविषयी

PCOS ची लक्षणे -

१. अंडाशयाला सूज येणं
२. परिपक्व बीज तयार न होणं
३. अनियमित मासिक पाळी
४. अंगावर व चेहऱ्यावर पुरळ
५. चेहऱ्यावरील / शरीरावरचे केस
६.मधुमेहाची समस्या असणं
७. लठ्ठपणा

हेही वाचा : #PCOS : पीसीओएसच्या समस्येवर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान

PCOS ची ही सर्वसाधारण लक्षणं आहेत. त्यामुळे ही लक्षण जाणवत असल्यास स्त्रियांनी डॉक्टरांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. 
(डॉ. प्रदीप महाजन हे स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह येथे मेडिसीन रिसर्चर आहेत.)