esakal | रेमेडिसिवीर घेण्याची योग्य वेळ कोणती? डॉक्टर म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir injection

रेमेडिसिवीर घेण्याची योग्य वेळ कोणती? डॉक्टर म्हणतात...

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

देशात सध्या कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच सोशल मीडियावर दररोज अनेक अफवा पसरत असतात. नागरिक कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता या अफवांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे सध्या कोरोना व लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये असंख्य गैरसमज असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच रेमेडिसिवीर हे इंजक्शन कोणी घ्यावी, कधी घ्यावं किंवा हे इंजक्शन घेतल्यामुळे नेमकं काय होतं याविषयी सविस्तर आज आपण जाणू घेऊयात.

कोरोना काळात वाढलेल्या प्रादुर्भावावर रिपर्पज्ड औषधे परिणामकारक ठरत आहेत. या औषधांमुळे रुग्णाच्या उपचारांमध्ये वेळेची बचत करते. सोबतच ही औषधे प्री-क्लिनिकल आणि अर्ली क्लिनिकल चाचणीमध्‍ये सुरक्षित असल्‍याची सिद्ध झाले आहे. ही औषधे थेट आजाराचा अंतिम टप्‍पा, म्‍हणजेच तिस-या टप्‍प्‍यामध्‍ये वापरता येऊ शकतात आणि कोविड-१९ वर उपचार म्‍हणून त्‍यांची सुरक्षितता व कार्यक्षमतेसाठी सुलभपणे मूल्‍यांकन करता येऊ शकते. हीच गोष्‍ट रेमेडिसिवीर सारख्‍या औषधांच्‍या बाबतीत करण्‍यात आली आहे. लक्षणे दिसून न येणा-या किंवा सौम्‍य ते मध्‍यम कोविड-१९ संसर्गाची लागण असलेल्‍या रूग्‍णांना रेमेडिसिवीर देण्‍यात आले आहे.

हेही वाचा: रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

रेमडेसीवर कसे काम करते?

विषाणूने मानवी पेशीमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर पेशी जेनेटिक घटक उत्‍सर्जित होतात, जे शरीराच्‍या विद्यमान यंत्रणेचा वापर करून शरीरभर पसरतात. संसर्गाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर विविध मानवी प्रोटीन्‍स, विषाणू प्रोटीन्‍स आणि त्‍यांची परस्‍परक्रिया होत असते. पुनरावृत्तीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये आरडीआरपी नावाचे प्रमुख व्‍हायरल प्रोटीन विषाणूचा स्रोत बनते. त्यामुळे या काळात रेमेडिसिवीर आरडीआरपीवर थेट हल्‍ला करुन त्याच्या विरोधात काम करते. रेमेडिसिवीर आवश्‍यक असलेल्‍या 'फिडिंग'ची गरज पूर्ण करते, त्यामुळे विषाणूला प्रतिरोध करुन विषाणूचा संसर्ग पसरण्याचं प्रमाण कमी होतं.

रेमेडिसिवीरचा वापर करण्‍याची योग्‍य वेळ?

सार्स-कोव्‍ह-२ विषाणूवरील उपचारासाठी यूएसएफडीएने प्रथम रेमेडिसिवीरला मान्‍यता दिली. हे औषध कोविड-१९ च्‍या गंभीर व महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यांदरम्‍यान प्रभावी ठरले. तसेच हे औषध हेपेटोटॉक्सिक असण्‍यासोबत यकृत पेशींना हानीकारक असल्‍याचे देखील आढळून आले. व्‍यावहारिकदृष्‍ट्या व्‍हायरलची पुनरावृत्ती पहिल्‍या १ ते ७ दिवसांमध्‍ये समाप्‍त होते, ७ ते ८ दिवसांनंतर गंभीर कोविड-१९ आजारासंदर्भात दिसण्‍यात आलेली जटिलता दाहक प्रतिक्रियेमुळे (एसआयआरएस) आहे. म्‍हणून, सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये, म्‍हणजेच व्‍हायरल पुनरावृत्ती होत असलेल्‍या दुस-या ते दहाव्‍या दिवसांदरम्‍यान या औषधाचा वापर करावा. ज्‍यामुळे शरीरातील विषाणूचा प्रभाव कमी होईल.

तुम्‍हाला रेमेडिसिवीरबाबत माहित असावी अशी महत्त्वपूर्ण बाब :

डब्‍ल्‍यूएचओच्‍या संशोधनानुसार रेमेडिसिवीर रूग्‍णांमधील मृत्‍यूंच्‍या प्रमाणात प्रतिबंध करत नाही किंवा हॉस्पिटलमधील उपचाराचा कालावधी लक्षणीयरित्‍या कमी करत नाही. गंभीर आजारी असलेल्‍या किंवा मल्‍टी–ऑर्गन डायस्‍फंक्‍शनपासून पीडित असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये या औषधाचा वापर करू नये. पण, सौम्‍य ते मध्‍यम संसर्ग असलेल्‍या आणि लक्षणे दिसून न येणा-या रूग्‍णांमध्‍ये त्‍याची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी संसर्गाच्‍या दुस-या व दहाव्‍या दिवसादरम्‍यान या औषधाचा वापर करावा. साथीच्‍या रोगादरम्‍यान रेमेडिसिवीरच्या परिणामकारकतेला महत्त्व मिळाले असले, तरी या औषधाच्‍या तुटवड्यामुळे हेल्‍थकेअर प्रदाते, पुरवठादार व रूग्‍णांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तुटवड्यामागे अनेक कारणे आहेत.

रेमेडिसिवीरचा वापर करण्‍याची योग्‍य पद्धत -

औषधाला अधिक मागणी असली तरी त्‍याचा योग्‍यप्रकारे वापर करणे माहित असलेच पाहिजे. या कोर्समध्‍ये सामान्‍यत: ५ दिवसांमध्‍ये ६ डोसेस दिले जातात (पहिल्‍या दिवशी २०० मिलीग्रॅम, त्‍यानंतर पुढील ४ दिवस १०० मिलीग्रॅम). या औषधाचा अधिक प्रमाणात वापर करू नये. गंभीर संसर्ग असलेल्‍या रूग्‍णांना हे औषध प्रीस्‍क्राइब केले जात नाही आणि औषध प्रीस्‍क्राइब करण्‍यापूर्वी रूग्‍णाची सखोल तपासणी केली जाते. हे औषध संसर्गाच्‍या १०व्‍या दिवसानंतर प्रीस्‍क्राइब केले जात नाही.

( डॉ. राहुल पंडित हे मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअरचे संचालक व महाराष्ट्र कोविड-१९ टास्कफोर्सचे सदस्य आहेत.)

loading image
go to top