
कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) जगातील बहुतांश देशात आधीच पोहोचल्याची शक्यता असून आता प्रंचड वेगाने पसरत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)दिला आहे. आतापर्यंत जगभरातील ७७ देशांमध्ये व्हेरिएंट रुग्ण सापडले आहे. WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस अडनॉम गेब्रियेसे यांनी सांगितले की, लोकांमध्ये कदाचित आधीच या व्हेरिएंटचे संक्रमण झालेले असेल पण याबाबत त्यांना माहित नसेल. अशाच प्रकारे हा व्हेरिअंट खूप वेगाने पसरत आहे.
ओमिक्रॉनच्या प्रभावाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची काळजी वाटत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा व्हेरिएंट धोकादायक असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. ओमीक्रॉनच्या संसर्गामुळे आजार गंभीर होत नाही पण रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. (WHO says Covid Omicron spreading at unprecedented rate Corona)
आधीच्या कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत ओमीक्रॉनचा संसर्ग वेगाने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर महत्त्वाची ठरू शकते.
मृत्यू किंवा गंभीर आजारास कारणीभूत नसलेल्या व्हेरिएंटसाठी बूस्टर दिल्याने ज्यांना पहिला डोस मिळाला नाही त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता कमी असते. लसींचा पूरवठा कमी असल्यामुळे, त्यांना अद्याप त्यांचा पहिला डोस मिळालेला नाही. "
कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा ओमीक्रॉन धोकादायक असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे असून त्याची लक्षण ही डेल्टा किंवा कोरनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळी असल्याची माहिती दक्षिण अफ्रिकेत ओमीक्रॉन व्हेरिएंट शोधणाऱ्या तज्ज्ञांनी दिली.
सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस भारतासह बहुतेक देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनिवार्य केले आहेत. काही ठिकाणी, RTPCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्टचे सर्टिफिटेक देखील आवश्यक आहे. पण अद्याप अजूनही कित्येकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देखील कित्येकांनी घेतला नाही.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील जवळपास 55 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान पहिला डोसन घेतला आहे. पण प्रत्येक देशांमधील लसीकरणाचे प्रमाण कमी जास्त आहे. भारतातही पुरेसं लसीकरण अद्याप झालं नसून, त्यामुळे नव्या व्हेरिटयंटची साख साथ पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, म्हणूनच लसीकरणाचा वेग वाढविण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.