esakal | 'एग्ज फ्रिजिंग' म्हणजे काय? सेलिब्रिटी का घेतायेत त्याचा आधार?
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant Women

'एग्ज फ्रिजिंग' म्हणजे काय? सेलिब्रिटी का घेतायेत त्याचा आधार?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोलच्या बहिणीने एग्जफ्रिजिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सोशल मीडियावर या एकाच गोष्टीची प्रचंड चर्चा रंगू लागली. अनेकांनी इंटरनेटवर एग्ज फ्रिजिंग म्हणजे काय हे मोठ्या प्रमाणावर सर्चदेखील केलं. त्यामुळेच एग्ज फ्रिजिंग म्हणजे नेमकं काय हे आपण डॉक्टरांकडूनच जाणून घेऊयात. (why-is-egg-freezing-so-popular-now)

एग्ज फ्रीजिंग या प्रक्रियेमध्ये स्त्रींच्या अंडाशयातील अंडी काढून त्यांना प्रयोगशाळेत सुरक्षितपणे जतन केले जाते. वैद्यकीय भाषेत एग्ज फ्रीजिंगला 'क्राइयो प्रिजर्वेशन' असे म्हणतात. एग्ज फ्रिजिंग या प्रक्रियेचा वापर करून स्त्रिया त्यांना हव्या त्या वयामध्ये आई होऊ शकतात. सर्वसामान्य स्त्री देखील या पद्धतीचा वापर करून तिला हव्या त्या वयामध्ये आई होण्याची इच्छा पूर्ण करू शकते. एखाद्या कुटुंबात मेनोपॉज अगदी कमी वयात होत असेल, त्या मुलींसाठी देखील हा पर्याय लाभदायक ठरू शकतो.

आई होण्याचं योग्य वय हे 20 ते 30 दरम्यान आहे. पण, जर एखादी स्त्री 20 ते 30 या वयात आई बनू इच्छित नसेल किंवा अन्य कारणांमुळे तिला उशीरा आई व्हायचं असेल तर अशावेळी एग्ज फ्रीजिंग पद्धतीचा वापर करून ती आई होऊ शकते. जास्त वयात सहजपणे आई बनण्यासाठी आणि गरोदरपणात येणाऱ्या कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी एग्ज फ्रीजिंग एक उत्तम उपाय आहे.

वाढत्या वयासोबत स्त्रियांची प्रजनन क्षमता अर्थात फर्टिलिटी कमी व्हायला सुरुवात होते. अनेकदा काही विशिष्ट कारणांमुळे वा काही शारीरिक समस्यांमुळे एग्जची क्वालिटी आणि प्रमाण सुद्धा कमी होऊ लागते. यामुळेच एका विशिष्ट वयानंतर स्त्रियांना नैसर्गिकरित्या गरोदर होणे शक्य होत नाही. म्हणून तरुण वयातच जर ही प्रक्रिया केली तर उत्तम ठरते कारण या वयात स्त्रियांच्या अंडाशयातील एग्ज हे चांगल्या क्वालिटीचे आणि अधिक प्रमाणात असतात. म्हणूंच या प्रक्रियेसाठी योग्य वय असणे गरजेचे असते. ही प्रक्रिया गुंतागुंतीची नसून यात फारशा वेदनाही होत नाहीत तसेच बाळही सुदृढ जन्माला येते.

हार्मोन्स बिजांडाची संख्या वाढविण्यासाठी दररोज दोन आठवडे हार्मोन्सचे इंजेक्शन घ्यावे लागते. वयोसोबतच अंड्यांची प्रत आणि संख्या कमी होत असल्याने हा पर्याय निवडण्यात येतो.तुम्ही जर एग्ज फ्रिजिंगचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्ही वंधत्व निवारण तज्ज्ञांशी संपर्क साधा, त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या चाचण्या करून घ्या.

(लेखिका डॉ.गरीमा शर्मा या मुंबईतील अपोलो फर्टीलिटी रुग्णालयात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत.)

loading image