esakal | World Arthritis Day: चार जणांमागे एकाला संधीवाताचा त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

World Arthritis Day

यावर्षी याचे ब्रीदवाक्य आहे 'डोन्ट डिले, कनेक्ट टुडे' अर्थात उशीर करू नका आजच डॉक्टरांशी संपर्क साधा.

World Arthritis Day: चार जणांमागे एकाला संधीवाताचा त्रास

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

12 ऑक्टोबर हा "जागतिक संधिवात" दिवस म्हणून संधिवाताबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून त्याचे लवकर निदान व योग्य उपचार करण्याच्या हेतूने दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी याचे ब्रीदवाक्य आहे 'डोन्ट डिले, कनेक्ट टुडे' अर्थात उशीर करू नका आजच डॉक्टरांशी संपर्क साधा. संधिवात हा अमेरिकेप्रमाणे भारतात सुद्धा नंबर 1 चा अपंगत्व निर्माण करणारा आजार आहे.

4 जणांमागे 1 रुग्ण संधिवाताने ग्रस्त; 18 ते 70 वयोगटात जास्त प्रमाण...

लक्षणे: सुरुवातीला एखादा सांधा किंवा गुडघे दुखू लागणे, सूज येणे, गरम होणे, जिने चढ-उतर करताना गुडघे किंवा सांधे दुखणे, खाली मांडी घालून बसायला त्रास होणे ही लक्षणे जाणवतात. त्यानंतर सांध्यामधून आवाज येणे, सांध्याच्या हालचाली कमी होणे किंवा सांधा आखडणे, गुडघ्याला किंवा सांध्याला बाक येणे व आजार बळावल्यानंतर माणसांना आपल्या नित्याच्या गोष्टी करण्यास त्रास होतो व चार पावले चालणे अवघड होऊन बसते, त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना असहाय्यतेचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: संधिवात रुग्णांनी व्यायाम करणे सोडू नये; या गोष्टींची काळजी घ्या

प्रकार: आस्टिओअर्थराईटीस म्हणजेच वयोमानानुसार हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊन संधिवात होणे. सर्वसाधारणतः गुडघ्यांवर याचा परिणाम होतो. रूम्याटाईड अर्थराइटिस हा एक ऑटो इम्युन आजार आहे. लहान मुलांच्यात सुद्धा जाणवतो.

गाऊट रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे होतो. सोरी आटिक अर्थराइटिस सोरियासिस च्या रुग्णांमध्ये जाणवतो. काहीवेळा सांध्यांमध्ये जंतुसंसर्ग किंवा मार लागल्यामुळे सुद्धा संधिवात उद्भवतो.

उपचार: नजीकच्या अस्थिरोगतज्ञाकडे जाऊन आपल्या लक्षणानुसार योग्य त्या रक्ताच्या चाचण्या, एक्स-रे, एम आरआय करून कोणत्या प्रकारचा संधिवात आहे हे निदान करून; सुरुवातीला वजन कमी करणे, आहार नियंत्रण, भौतिक उपचार, सांध्यांना शेकणे, वेदनाशामक, नि क्याप वगैरे वापरून तसेच आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवून एक कॅल्शियमची गोळी दररोज घ्यावी. नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे व उपचार चालू ठेवणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे न केल्यास लक्षणे बळावत जातात व पुढे एखादी शस्त्रक्रिया करण्यापर्यंत परिस्थिती उद्भवू शकते. गुडघ्यांना जेव्हा खूप बाक येतो व औषधोपचार कामी येत नाहीत त्यावेळी रशियन एलिझा रोव्ह या दोनच टाक्याच्या गुडघा न बदलता शस्त्रक्रियेने अतिशय चांगले परिणाम येतात. रुग्णाला मांडी घालून खाली बसता येते व पुढे पंधरा ते वीस वर्ष आपला सांधा अतिशय व्यवस्थित प्रमाणे वापरू शकतो. इलिझारोव्हही शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी व जास्त खर्चिक नाही. अर्थरोस्कोपी ने सांधे साफ करून तात्पुरता आराम मिळू शकतो. जर सांधे खूपच खराब झाले तर त्या वेळेला जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून कृत्रिम सांधेरोपण केले जाते. ही शस्त्रक्रिया मोठी व खर्चिक आहे.

हेही वाचा: संधिवात कसा नियंत्रित कराल?

रुग्णांचे लवकर आणि योग्य उपचार झाल्यास कोणत्याही वयापर्यंत रुग्ण आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो.

- डॉ. संदीप आडके, अस्थीरोग व रशियन इलिझारोव्हतज्ञ

loading image
go to top