World COPD Day : धूम्रपान न करता ५० टक्के लोकांना सीओपीडी; फुफ्फुसाचा गंभीर आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World COPD Day

World COPD Day : धूम्रपान न करता ५० टक्के लोकांना सीओपीडी

नागपूर : फुफ्फुसाचा गंभीर आजार म्हणून ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्‍टीव्ह पल्मनरी’ (सीओपीडी) या आजाराकडे बघितले जाते. जगात ‘सीओपीडी’चे साडेसहा कोटी रुग्ण आहेत. हा आजार होण्यास तंबाखूचा धूर, बायोमास इंधनाचा धूर, औद्योगिक प्रदूषण, पर्यावरणीय प्रदूषणे, डास नियंत्रक क्वाईल कारणीभूत ठरतात. विशेष असे की, धूम्रपान न करता केवळ संपर्कात आलेल्या ५० टक्के लोकांना हा आजार जडल्याचेही वास्तव पुढे आल्याचे प्रसिद्ध छातीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.

‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्‍टीव्ह पल्मनरी’ आजारामुळे दरवर्षी ३० लाख मृत्यू होत असल्याचे २००५ साली झालेल्या सर्वेक्षणातून पुढे आले. सद्या कोरोनाचे भय आहे, अशावेळी नागपूर शहरात वाढत्या प्रदूषणाने दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. श्वसनाद्वारे शरीरात दूषित धूर गेल्यास ही व्याधी होण्याचा धोका आहे. अस्थमा आणि ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्‍टीव्ह पल्मनरी डिसीज’च्या रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होणे ही समान समस्या असते.

हेही वाचा: वि. प. निवडणूक : महाविकास आघाडीविरुद्ध भाजपला उमेदवार मिळेना!

‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्‍टीव्ह पल्मनरी’ रुग्णाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, रक्त गोठणे, मेंदूचा पक्षघात, असे गंभीर आजार होण्याची भीती असते. या व्याधीचा त्रास झाल्यास दहा सेकंदात डॉक्‍टरांकडून तपासणी होण्याची गरज आहे.

एका मॉस्किटो कॉईलने १०० सिगारेटचे प्रदूषण

पुणे येथील चेस्ट रिसर्च फाउंडेशनने राबवलेल्या सर्वेक्षणात एका मॉस्किटो कॉईलच्या धुराने तब्बल १०० सिगरेटच्या धुराएवढे प्रदूषण होत असल्याचे काही वर्षांपूर्वी आढळून आले होते. त्यातच नागपूरच्या क्रीम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ८२ टक्‍के पुरुष व १८ टक्‍के महिलांना हा आजार झाल्याचे पुढे आले होते. ‘सीओपीडी’च्या एकूण रुग्णांपैकी ४८ टक्‍के लोक तिसऱ्या स्टेजवर असतात. तर धूम्रपान न करता केवळ संपर्कात आलेल्या ५० टक्के लोकांना हा आजार जडला असल्याचेही वास्तव पुढे आल्याचे डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.

हेही वाचा: ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्काचा फोटो पाहून विराट म्हणाला...

लक्षणे

  • कायम स्वरूपाचा कफ

  • कफाचे बेडके

  • व्यायाम करताना श्‍वास भरणे

  • दैनंदिन कामे करताना दम लागणे

फुफ्फुसात श्वास घेताना धूर, धूम्रपान करणाऱ्याजवळ उभे असल्यास कार्बन मोनॉक्साईड, सल्फरडाय ऑक्साइड, धुलीकणसह अनेक कण प्रवेश करतात. फुफ्फुसात ‘अ‍ॅल्विओलाय’ घटक रक्तात ऑक्सिजन सोडण्याचे व कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेण्याचे कार्य करते. हे प्रदूषित घटक ‘अ‍ॅल्विओलाय’वर आघात करतात. त्याचे आवरण वाढते. त्यामुळे फुफ्फुसाची लवचिकता कमी होते. त्यामुळे शरीराला पुरेसा प्राणवायू मिळत नाही. कार्बनडाय ऑक्साइडचे योग्य उत्सर्जन होत नाही. यातून सीओपीडी वाढतो.
- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, नागपूर
loading image
go to top