ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्का शर्माचा फोटो पाहून विराट म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma

ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्काचा फोटो पाहून विराट म्हणाला...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : एका मुलाची आई झालेली अनुष्का शर्माने स्वतःला काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर ठेवले आहे. चित्रपटांपासून दूर असले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती फोटो शेअर करत असते. आता काही महिन्यांनंतर तिने फोटो शेअर केलेत. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का ग्रीन मोनोकनीमध्ये दिसत आहे.

स्वत: अभिनेत्रीने फोटोच्या कॅप्शनमध्ये वनस्पतीचा एक इमोजी देखील टाकला आहे. अनुष्काचे हे ताजेतवाने छायाचित्र निसर्गाशी तिची असलेली ओढ स्पष्टपणे सांगत आहे. पहिल्या चित्रात अनुष्का शर्मा आनंदाने हसताना तर दुसऱ्या चित्रात तिचे किलर स्माईल दिसत आहे.

हेही वाचा: ‘कंगना राणावतवर मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करा’

प्रेग्नंसीनंतर अनुष्काने तिचा मोनोकॉनीतील फोटो शेअर केला आहे. अलीकडेच अनुष्काने एका मॅगझिन शूटसाठी जबरदस्त आकर्षक फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक नेट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अनुष्का शेवटी २०१८ मध्ये झिरो या चित्रपटात दिसली होती. यानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित केले.

चित्रपटात पुनरागमनाची प्रतीक्षा

व्यावसायिक जीवनातून ब्रेक घेतल्यानंतर अनुष्काने यावर्षी जानेवारीमध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. आजकाल अनुष्का अनेक ब्रँड एंडोर्समेंटमध्ये दिसत आहे. मात्र, तिचे चित्रपटात पुनरागमन कधी होणार, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कुत्र्यांचा बळी; अधिकाऱ्यांवर दबाव

कोहलीने दिली खास प्रतिक्रिया

पूलसाइड अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या फोटोवर पती विराट कोहलीनेही खास प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या पूलसाइड पोज देत असलेल्या या फोटोंवर हसतमुख इमोजी टाकला आहे. हा इमोजी विराटचा आनंद आणि पत्नी अनुष्काच्या सौंदर्याने प्रभावित झाल्याची भावना व्यक्त करत आहे.

loading image
go to top