14 नोव्हेंबरला का साजरा करतात World Diabetes Day?

जागतिक मधुमेह दिनाचा इतिहास, महत्त्व आणि थीमबाबत जाणून घ्या
14 नोव्हेंबरला का साजरा करतात  World Diabetes Day?

जागतिक मधुमेह दिन दरवर्षी 14 नोव्हेंबरला जगभरात साजरा केला जातो. 1922 मध्ये चार्ल्स हर्बर्ट बेस्टसह इन्सुलिन हार्मोनचा शोध लावणारे सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जगभरात अंदाजे 463 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत तेही टाईप-2 मधुमेह, ज्यावर उपचार करण्यासाठी सुमारे 90 टक्के प्रकरणांमध्य इंसुलिन सेन्सिटायझर्सने आवश्यक आहे.

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यवसायिकांच्या अंदाजानुसार, ही आकडेवारी वाढतच जाईल आणि मधुमेहामुळे एखाद्या व्यक्तीचा लवकर मृत्यू होण्याचा धोका दुप्पट होतो हे लक्षात घेता, चयापचय विकारांबद्दल जागरुकता वाढवण्याची गरज आहे आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी टिप्सचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

14 नोव्हेंबरला का साजरा करतात  World Diabetes Day?
World Diabetes Day 2021 : ब्लड प्रेशरची औषध मधुमेहासाठी फायदेशीर; संशोधनाचा निष्कर्ष

जागतिक मधूमेह दिनाची थीम (World Diabetes Day Theme)

जागतिक मधुमेह दिन 2021-23 ची थीम आहे “मधुमेहाच्या काळजीसाठी प्रवेश – आता नाही तर कधी?” असा संदेश देत वेळीच मधूमेहाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या थीममार्फत मधूमेहातील मेलीस चयापचय विचारांचा संचाबाबत लोकांमध्ये जागरुक राहण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे जेणे करुन लोकांना रोग, उपाचार, आहारातील बदल आणि व्यायामाबाबत, आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही स्वीकार्य मर्यादेत ठेवण्याच्या उद्देशाने ज्ञान मिळेल.

ही कॅम्पेन निळ्या रंगाच्या वर्तुळ लोगोद्वारे दर्शविले जाते जे 2007 मध्ये UN च्या मधुमेहावरील ठराव पास झाल्यानंतर स्वीकारण्यात आला होता. हे निळे वर्तुळ मधुमेह जागृतीचे जागतिक प्रतीक आहे आणि मधुमेह महामारीच्या विरोधात जागतिक मधुमेह समुदायाची एकता दर्शवते.

जागतिक मधुमेह दिन: इतिहास (World Diabetes Day History)

मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आरोग्य धोक्याबाबत वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह फाउंडेशन (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे 1991 मध्ये करण्यात आली.

जागतिक मधुमेह दिनाला UN ने 2006 मध्ये एक ठराव मंजूर करून अधिकृतपणे मान्यता दिली.

14 नोव्हेंबरला का साजरा करतात  World Diabetes Day?
World diabetes day 2021 : 'या' हेल्दी फुड्सचा शरीरावर होईल उलट परिणाम

जागतिक मधुमेह दिन: महत्त्व (World Diabetes Day Significance)

मधुमेह मेल्तिस आजाराबद्दल जाणून घेणे आणि त्याच्या उपचारात सक्रियपणे भाग घेणे हे मधूमेह दिन साजरा करण्यामागचे महत्वाचे आहे कारण रक्तातील साखरेची पातळी चांगल्या प्रकारे निंयत्रित केलेल्या लोकांमध्ये गुंतागुंत सामान्य असते किंवा गंभीर नसते.

IDF च्या मते, मधुमेहाबद्दल जागरुकता वाढवण्यात लोक सहभागी होऊ शकतात असे काही मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

1. मधुमेह असलेल्या सर्व लोकांना त्यांना आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध करुन देणे आणि काळजी घेतली जात आहे ना याची खात्री करण्यासाठी स्थानिक किंवा राष्ट्रीय धोरण-निर्मात्यांना गुंतवणे.

२. शाळांमध्ये ‘मधुमेहाबद्दल जाणून घ्या’ कार्यक्रमाचे आयोजन.

3. स्थानिक मधुमेह जागरूकता वॉक आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे.

4. स्थानिक परिसरातील प्रसिध्द ठिकाण, घर किंवा कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाची लाईटिंग करणे किंवा मधुमेहाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत उपक्रम आयोजित करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com