World Health Day | दैनंदिन जीवनात अवलंबवा ‘या’ 5 सवयी! आजार येणार नाहीत जवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Health Day News | Health Tips

चांगल्या आयुष्यासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे.

World Health Day: दैनंदिन जीवनात अवलंबवा ‘या’ 5 सवयी! आजार येणार नाहीत जवळ

जागतिक आरोग्य दिन (World Health Day) दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 1948 मध्ये झाली होती, ज्याचा उद्देश लोकांना आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्येबद्दल जागरूक करणे हा आहे. चांगल्या आयुष्यासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या काळातील लाइफस्टाइल (LifeStyle) आणि अनहेल्दी फूड (Food) हॅबिट्सच्या सवयींमुळे आपण आपल्या आरोग्याची (Health) विशेष काळजी घेऊ शकत नाही. आज आपण निरोगी राहण्यासाठी अवलंबू शकता अशा 5 सवयींबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा: सकाळी सकाळी ऐका निर्सगातील आवाज! सुधारेल मानसिक आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी या 5 सवयी अवलंबा (Health Tips)

निरोगी आहार घ्या-

निरोगी राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार घेणे खूप गरजेचे आहे. आपल्या रोजच्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच जंक फूड, फास्ट फूड, साखर, कोल्डड्रिंक्सचे सेवन कमी करा.

शरीराला हायड्रेटेड ठेवा-

शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून एका दिवसात किमान 8 ते 9 ग्लास पाणी प्या. कारण शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर आपण हे केले नाही तर आपल्याला डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराची बहुतेक घाण बाहेर पडते.

हेही वाचा: असा करा उष्माघाताला प्रतिबंध उन्हापासून प्रत्येकाने आपले संरक्षण करण्याच्या आरोग्य खात्याच्या सूचना

झोप पूर्ण करा-

तुमचं दैनंदिन आयुष्य कितीही व्यस्त असलं तरी 7 ते 8 तासांची झोप घेणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश तर वाटेलच, शिवाय टेन्शनपासूनही दूर राहाल. मानसिक आरोग्यासाठी हे करणे महत्त्वाचे आहे.

नियमित व्यायाम करा-

जर तुम्हाला फिट राहायचं असेल आणि पोटाची चरबी वाढू नये असं वाटत असेल तर नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. यात चालणे, जॉगिंग, पोहणे आणि जिममध्ये जाण्याचे पर्याय आहेत.

दारू, सिगारेटपासून दूर राहा-

धूम्रपान आणि मद्यपान करणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. जर तुम्हाला याचे व्यसन असेल तर आजच दारू, सिगारेट बंद करा . कारण यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

Web Title: World Health Day 2022 These 5 Good Habits Can Change Your Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top